इराण हल्ल्यात मृत्यूची अफवा; व्हिडिओ शेअर करत बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, ‘मी कॉफीसाठी मेलोय’

रविवारी त्यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नेतन्याहू पूर्णपणे ठीक दिसत असून ते एका कॅफेमध्ये ऑर्डर करताना दिसून येत आहेत.

Untitled Design 32

Untitled Design 32

Sharing the video, Benjamin Netanyahu said : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांदरण्यां रविवारी त्यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नेतन्याहू पूर्णपणे ठीक दसत असून ते एका कॅफेमध्ये ऑर्डर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत पसरलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये इराणच्या हल्ल्यात पंतप्रधान नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, इस्रायल सरकारने सुरूवातीपासूनच हा दावा फेटाळून लावत तो पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले होते. आता स्वतः नेतन्याहू यांनीच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या अफवांना चपराक दिली आहे. या व्हिडिओमध्ये ते आपल्या मृत्यूबाबतच्या अफवांचा हलक्याफुलक्या शैलीत समाचार घेताना देखील दिसून येतात.

व्हिडिओमध्ये काय म्हणाले नेतन्याहू?

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये नेतन्याहू म्हणतात, मी मेलो आहे… कॉफीसाठी. प्रत्यक्षात हा हिब्रू भाषेतील एक म्हण असून त्याचा अर्थ एखादी गोष्ट खूप आवडणे असा होतो. पुढे ते म्हणाले, तुम्हाला माहित आहे का, मी माझ्या लोकांसाठी मारत आहे? ते ज्याप्रकारे वागत आहेत ते खरोखरच उत्कृष्ट आहे.

पुणे शहरात जुन्या गाड्यांवर बंदी येणार ? मुख्य भागात लो एमिशन झोन लागू करण्याच्या हालचाली

दरम्यान त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपले दोन्ही हात उंचावत बोटेही दाखवली. सोशल मीडियावर काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, 12 मार्च 2026 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या एका हातात सहा बोटे दिसत होती आणि ती व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला होता. या अफवेवर प्रतिक्रिया देताना नेतन्याहू म्हणाले, तुम्हाला माझी बोटे मोजायची आहेत का? ती इथे स्पष्ट दिसत आहेत, पाहा

इस्रायली नागरिकांना दिला संदेश

यावेळी पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायलच्या नागरिकांना देखील संदेश दिला, ते म्हणाले की, त्यांना कॉफी खूप आवडते आणि आपल्या लोकांबद्दल देखील त्यांना तितकाच आपुलकीचा भाव आहे. नागरिकांना उद्देशून त्यांनी सांगितले, थोडावेळ बाहेर जा, ताजी हवा घ्या, मात्र एखाद्या सुरक्षित ठिकाणाजवळच राहा. तुमचे धैर्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यातून मला, आमच्या सरकारला, इस्रायली सुरक्षा दलांना आणि मोसादलाही ताकद मिळते. ते पुढे म्हणाले की, इस्रायल इराणला कठोर प्रत्युत्तर देत आहे. आम्ही काही अशी कामे करत आहोत ज्याबद्दल मी आता सांगू शकत नाही. पण आम्ही आज देखील इराणला कडक उत्तर देत आहोत. तुम्ही मला पुढे चालू ठेवा असे म्हणत असाल, तर मी देखील तुम्हाला सांगतो, तुम्हीही पुढे चालत राहा.

Exit mobile version