नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडनच्या केंम्ब्रिज युनिवर्सिटीमध्ये भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी केलेलं एक वक्तव्या चांगलंच चर्चेत आलं आहे. राहुल गांधी यांनी या युनिवर्सिटीमध्ये केलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे की, ‘भारतामध्ये लोकशाहीची स्थिती चिंताजनक आहे.’त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला की, ‘त्यांच्या फोनची पेगॅससच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आली. याची माहिती त्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या या गंभीर आरोपानंतर आता पुन्हा एकदा पेगाससचा मुद्दा चर्चेला आला आहे.
Here is the full Video of Rahul Gandhi’s Lecture at @CambridgeMBA @CambridgeJBS
“The art of listening” when done consistently and diligently is “very powerful,” – @RahulGandhi https://t.co/4ETVo0X45f#BharatJodoYatra#RahulGandhiinCambridge pic.twitter.com/tDI4ONieG0
— Sam Pitroda (@sampitroda) March 3, 2023
याच भाषणामध्ये त्यांनी पुढे सांगितले की, भारतात विरोधी पक्षांना धमक्या दिल्या जात आहे. विरोधी पक्षांवर दबाव आणला जात. कारण विरोधी पक्षांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्या विरूद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
NCP Win Nagaland Election : नॉर्थ ईस्टमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शिरकाव’
लंडनच्या केंम्ब्रिज युनिवर्सिटीमध्ये कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जगभारात लोकशाहीला पूरक वातावरण निर्माण करण्यात यावं. याविषयावर आपले विचार मांडले. यामध्ये त्यांनी सध्या भारत आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये लोकशाहीची स्थिती चिंताजनक आहे. याला कारण विषमता आणि नाराजी आहे. ज्याकडे तात्काळ लक्ष देण्याची आणि त्यावर संवाद साधण्याची गरज आहे. असं देखील यावेळी राहुल गांधी यांनी सांगितलं.