Download App

श्रीलंकेत आज राष्ट्रपती निवडणूक; दीड कोटी मतदार अन् 39 उमेदवार, कुणाचं पारडं जड..

भारताचा शेजारी देश श्रीलंकेत आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत (Sri Lanka Presidential Election) आहे.

Sri Lanka Presidential Election : भारताचा शेजारी देश श्रीलंकेत आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत (Sri Lanka Presidential Election) आहे. देशात आर्थिक संकट कायम असताना (Sri Lanka Crisis) या निवडणुका होत आहेत. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत अराजक परिस्थिती निर्माण झाली होती. देशातील जनतेने आंदोलन केल्याने तत्कालीन राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांना देश सोडावा लागला होता. यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी संसदीय मते मिळवत देशाचा कारभार आपल्या हाती घेतला होता.

सन २०२२ मध्ये विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती म्हणून देशाचा कारभार हाती घेतला. या घडामोडींनंतर दोन वर्षांनी देशात निवडणुका होत आहेत. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ३९ उमेदवार रिंगणात आहेत. देशातील १.७ कोटी लोक मतदानासाठी पात्र आहेत.

निवडणुकीच्या मैदानात असे काही उमेदवार आहेत ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. मुख्य लढत मात्र चार ते पाच उमेदवारांत होईल अशी शक्यता आहे. यामध्ये विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे नाव आघाडीवर आहे. ते यंदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

एका बेटावरून तामिळनाडूत निवडणुकीचे वातावरण तापणार? भाजपने काँग्रेसला खिंडीत गाठले !

विक्रमसिंघे यांच्या पक्षाकडे संसदेत फक्त एक जागा आहे. त्यामुळे त्यांना आता अन्य प्रमुख पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. महागाई कमी (Inflation) करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर जनता खुश आहे. परंतु आयएमएफकडून (IMF) कर्ज मिळवण्यासाठी करात वाढ केल्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजीही आहे. तरीदेखील या निवडणुकीत विक्रमसिंघे याचं पारडं जड मानलं जात आहे.

सजिथ प्रेमदासा

सजिथ प्रेमदासा माजी राष्ट्रपती रनसिंघे प्रेमदासा यांचे पुत्र आहेत. समागी जन बालवेगया या पक्षाचे नेतृत्व त्यांच्या हाती आहे. त्यांच्या पक्षाने आयएमएफबरोबर २.९ बिलियन बेलआऊट कार्यक्रमात बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाने अन्य काही लहान पक्षांना सोबत घेतले आहे. या निवडणुकीत सजिथ प्रेमदासा यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे.

अनुरा कुमार दिसानायके

५५ वर्षीय नेते अनुरा कुमार दिसानायके ज्यांच्याकडे संसदेत फक्त तीन सदस्य आहेत. भ्रष्टाचार विरोधी निर्णयावर त्यांचा पूर्ण फोकस राहणार आहे. नॅशनल पीपल्स पावर किंवा एनपीपी आघाडी अंतर्गत निवडणूक लढणार आहेत. यामध्ये त्यांची पीपुल्स लिबरेशन फ्रंट ही पार्टी सहभागी आहे.

Sri Lanka : वाईट काळात भारताने आम्हाला मदत केली, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री

नमल राजपक्षे

श्रीलंकेच्या अधोगतीला जबाबदार धरले जात असलेल्या राजपक्षे परिवारातूनच नमल राजपक्षे येतात. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे नमल राजपक्षे पुत्र आहेत. 38 वर्षांच्या नमल यांची उमेदवारी निश्चित होण्याआधी श्रीलंका पोदुजना पेरामुना पक्ष रानिल विक्रमसिंघे यांना समर्थन देत होता. नमल सर्वात युवा उमेदवार आहेत. देशातील रोजगार आणि अर्थव्यवस्था सुदृढ करण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे.

नुवान बोपेज

40 वर्षीय नुवान बोपेज पीपुल्स स्ट्रगल अलायन्सचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. भ्रष्टाचार विरोधात त्यांची कठोर भूमिका आहे. आयएमएफ कार्यक्रमासह श्रीलंकेच्या नियमांचा त्यांनी विरोध केला आहे.

follow us