महागाईने त्रस्त PAK मध्ये मिळणार तीन इंच सँडविच; Subway चा मोठा निर्णय

Subway Mini Sandwich For Pakistan : गेल्या दीड वर्षांपासून महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानसाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सब-वे (Subway) ने मोठा निर्णय घेतला असून, महागाईने त्रस्त पाकिस्तानातील लोकांना दिलासा देण्यासाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सबवेने 3 इंची सँडविच लाँच केले आहे. या अंतर्गत आता पाकिस्तानमध्ये सब-वेचे तीन इंच सँडविच (Subway Mini Sandwich) मिळणार आहे. नागरिकांना यासाठी […]

Letsupp Image   2023 09 15T170227.631

Letsupp Image 2023 09 15T170227.631

Subway Mini Sandwich For Pakistan : गेल्या दीड वर्षांपासून महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानसाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सब-वे (Subway) ने मोठा निर्णय घेतला असून, महागाईने त्रस्त पाकिस्तानातील लोकांना दिलासा देण्यासाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सबवेने 3 इंची सँडविच लाँच केले आहे. या अंतर्गत आता पाकिस्तानमध्ये सब-वेचे तीन इंच सँडविच (Subway Mini Sandwich) मिळणार आहे. नागरिकांना यासाठी 350 रुपये एवढी किंमत मोजावी लागणार असून, अशाप्रकारे सँडविचचा आकार कमी करण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीयांनी इनरवेअर घालणं बंद केलं? रुपा ते जॉकीपर्यंत बड्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण

सबवे सहसा 6-इंच आणि 12-इंच सँडविचची विक्री करतो. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी छोट्या आकारातील सँडविच बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महागाईमुळे पाकिस्तानमधील अनेक हॉटेल्समध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे अनेकांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीचा विचार करून कंपनीने कमी किमतीत सँडविचचा आकार लहान करण्याचा निर्णय घेतला आहे.

NCP : पक्षसंघटनेत दुर्लक्ष, जिल्ह्यांकडेही फिरवली पाठ; अजितदादा, पटेलांनी मागितलं मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक

केवळ सबवेनेच हे पाऊल उचलले आहे असे नाही, तर पाकिस्तानातील अनेक रेस्टॉरंट्स तेथील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याअंतर्गत अनेक उपाहारगृहांनी खाद्यपदार्थांच्या किमती कमी केल्या आहेत किंवा प्रमाण कमी केले आहे.


अन्नधान्याची चलनवाढ 38.5 टक्क्यांवर

आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची चलनवाढ 38.5 टक्क्यांवर पोहचली असून, ऑगस्टमध्ये महागाई दर 27.38% होता. तर, दुसरीकडे पेट्रोल आणि अन्य वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 6 टक्के होता जो आता 6 पट वाढला आहे.

Exit mobile version