Download App

अंतराळात नऊ महिने मुक्काम, सुनीता विलियम्सना पगार किती मिळणार? रक्कम ऐकून बसेल धक्का

गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांची अखेर पृथ्वीवर वापसी होत आहे.

Sunita Williams : गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांची अखेर पृथ्वीवर वापसी होत आहे. बुधवारी पहाटे सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतील अशी माहिती आहे. आठ दिवसांच्या अगदी लहान अंतराळ मोहिमेसाठी सुनिता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर अंतराळात गेले होते. परंतु नऊ महिने उलटले तरी देखील हे यात्री पृथ्वीवर परतलेले नाहीत. तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा अंतराळातील मुक्काम वाढतच गेला.

पण आता या दोघांना पृथ्वीवर परत आणण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी पहाटे सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर माघारी येतील. मागील नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) अडकलेल्या या दोन्ही अंतराळ यात्रीना आता नासा अतिरिक्त (NASA) मोबदला देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. चला तर मग आज याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..

धक्कादायक! इस्त्रायलकडून गाझावर ‘एअर स्ट्राईक’, २३२ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जखमी

नासा अतिरिक्त पगार देणार का?

नासामध्ये एस्ट्रोनॉट्स सरकारी कर्मचारी असतात. या कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही ओव्हरटाईम मानधन मिळत नाही. या कर्मचाऱ्यांची सॅलरी GS-15 पे ग्रेड अंतर्गत होते. या पे अंतर्गत अमेरिकेतील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना पगार दिला जातो. या हिशोबाने सुनीता विलियम्स यांना नऊ महिन्यांसाठी 81 लाख ते 1.05 कोटी रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. पण जर तुम्हाला वाटत असेल की आपले घरदार सोडून इतके दिवस अंतराळात राहिले म्हणून काही बोनस तरी मिळेल. याच गणित नक्की काय हेही समजून घेऊ..

नासा अंतराळ यात्रींना फक्त 4 डॉलर म्हणजेच 347 रुपये प्रति दिवस इन्सिडेंटल भत्ता देतो. म्हणजेच सुनीता विलियम्स यांना त्यांच्या नऊ महिन्यांच्या मोहिमेसाठी फक्त 1 लाख रुपये अतिरिक्त मिळू शकतात. नऊ महिने जीवाची पर्वा न करता इतके दिवस अंतराळात राहिल्यानंतर सुद्धा इतका कमी भत्ता मिळतो. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हीच वस्तुस्थिती आहे.

स्पेसक्राफ्टचे धोके काय आहेत

स्पेस x फाल्कन 9 रॉकेट 400 किलोमीटर प्रवास तीन तासांत पार करून अटलांटिक महासागर किंवा मेक्सिको खाडीत स्प्लॅश डाऊन होईल. पण पृथ्वीवर वापसी वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. एक्सपर्टनुसार ज्यावेळी ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करील त्यावेळी त्याचा अँगल एकदम बरोबर असणे गरजेचे आहे. यात थोडी जरी चूक झाली तरी मोठी दुर्घटना होऊ शकते. याआधी असा अनुभव आला आहे. माहितीनुसार सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्या जागी एनी मॅकलेन, निकोल एयर्स, टाकूया ओनिशी आणि किरिल पेस्कोव नवीन मिशन सांभाळतील.

कोणत्याच देशाचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचं काय होतं? जाणून घ्या, नियम अन् कायदे..

follow us