Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) आज तब्बल 9 महिन्यानंतर सुरक्षित पृथ्वीवर परतले आहे. 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दोघे पोहोचले होते मात्र त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे त्यांना 9 महिने तिथेच राहावे लागले. तर आता अवकाशातून सुनीता विल्यम्स महाकुंभ (Maha Kumbh 2025) पाहात होती अशी माहिती सुनीता विल्यम्स यांची वहिनी फाल्गुनी पांड्या (Falguni Pandya) यांनी एका मुलाखतीमध्ये दिली. तसेच लवकरत सुनीता विल्यम्स भारतात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची वहिनी फाल्गुनी पांड्या एनडीटीव्ही वृत्तवाहीनीशी बोलताना म्हणाल्या की, सुनीता विल्यम्स यांनी मला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्याचा फोटो पाठवला होता. मी कुंभाला जाण्यापुर्वी सुनीताला विचारले की, तुम्ही अंतराळातून कुंभ पाहू शकते का आणि जर पाहात असेल तर कुंभ कसा दिसतो. तेव्हा त्यांनी मला फोटो पाठवला. अशी माहिती त्यांनी दिली.
सुनीता विल्यम्स भारतात येणार
तसेच सुनीता विल्यम्स लवकरच भारतात येणार आहे. अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. तारीख फिक्स नाही पण सुनीता लवकरच भारतात येणार आहे. मला आशा आहे की, या वर्षी सुनीता भारतात येईल असं त्यांनी चॅनेलला सांगितले.
तर दुसरीकडे 9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बुधवारी पहाटे 03.27 वाजता अमेरिकेच्या फ्लोरिडातील तल्लाहसीच्या किनाऱ्यावर स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानात सुरक्षितपणे उतरले. या मोहिमेदरम्यान त्यांनी 900 तासांचे रिसर्च आणि 150 हून अधिक प्रयोग केले असल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. याच बरोबर त्यांनी या मोहिमेदरम्यान अंतराळ स्थानकाच्या बाहेर 62 तास 9 मिनिटे घालवली म्हणजेच त्यांनी 9 वेळा स्पेसवॉक केला असल्याचीही माहिती नासाने दिली आहे.