ढाकाच्या राजकारणात खळबळ; ‘डार्क प्रिन्स’ची 17 वर्षानंतर घरवापसी; भारतासाठी धोक्याची घंटा की नवी उमेद?

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या प्रमुख बेगम खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान हा तब्बल 17 वर्षांनंतर मायदेशी परतला.

Untitled Design (149)

Untitled Design (149)

Tariq Rahman, known as the ‘Dark Prince’, returns home after 17 years : बांग्लादेशच्या राजकारणात एक महत्वाची घडामोड घडली आहे. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या(BNP) प्रमुख बेगम खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान(Tariq Rahman) हा तब्बल 17 वर्षांनंतर मायदेशी परतला आहे. तारिक रहमान यांच्या पुनरागमनानंतर बीएनपी समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. देशाच्या राजकारणाला एका निर्णायक वळणार घेऊन जाणारी ही घटना मानली जात आहे. बांग्लादेशमध्ये(Bangladesh) मागील काही काळापासून राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशातच तारिक रहमान हे देशात परतले आहेत. देशातील विविध भागांत हिंसक आंदोलने सुरू आहेत, तर जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टरवादी शक्ती आपला प्रभाव वाढवत आहेत.

तारिक रहमानचे मायदेशी परतणे भारतासाठी महत्त्वाचे का आहे?

तारिक रहमानचं मायदेशी झालेलं आगमन हे दिल्लीसाठी महत्वाचं मानलं जात आहे. प्रो इंडिया समजल्या जाणाऱ्या अवामी लीगला निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली असून खालिदा झिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा वेळी बांग्लादेश अशा एका निर्णायक वळणावर उभा आहे, जिथं अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात कट्टर इस्लामी घटक सक्रिय आहेत आणि भारतविरोधी वक्तव्यांत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. भारतासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे जमात-ए-इस्लामी, जी पाकिस्तानची आयएसआय समर्थक मानली जाते. शेख हसीना सरकारच्या काळात बंदी घालण्यात आलेल्या जमातने गेल्या वर्षी सत्ताबदलानंतर पुन्हा एकदा राजकारणात आपलं महत्वाचं असं स्थान निर्माण केलं.

गोपनीयतेच्या अनुषंगाने सचिवालयाचे नवे निर्देश; संसद परिसरात स्मार्ट गॅजेट वापरण्यावर बंदी

निवडणुकीमधील समीकरणं आणि जमातची वाढती ताकद

नुकत्याच हाती आलेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार बीएनपी हा पक्ष निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याची शकता वर्तवली गेली आहे. मात्र जमात-ए-इस्लामी देखील त्यांना कडवी टक्कर देताना दिसून येत आहे. ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत जमातीच्या विद्यार्थी संघटनेने अनपेक्षित विजय नोंदवल्यामुळे भारताची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

भारतासाठी हे सकारात्मक संकेत का आहे?

भारत आणि बांगलादेशमधील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या ताणले गेले असले तरी देखील भारत बीएनपी ला तुलनेने उदारमतवादी आणि लोकशाही पर्याय म्हणून पाहतो. तारिक रहमान यांच्या पुनरागमनाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीएनपी बांग्लादेशमध्ये सरकार स्थापन करू शकेल अशी आशा भारताला आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशने चीन आणि पाकिस्तानपासून थोडं दूर राहत भारतासोबतचे संबंध जोपासले होते. शेख हसीना यांचं सरकार जाऊन युनूस सरकार आल्यानंतर बांगलादेशची पाकिस्तानशी जवळीक वाढली आणि भारतासोबतचे संबंध बिघडले. आता बीएनपी सत्तेत आल्यानंतर आपल्या परराष्ट्र धोरणात बदल होईल अशी भारताला आशा आहे. 1 डिसेंबर रोजी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी खालिद झिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत भारताच्या समर्थनाची ऑफर दिली होती. बीएनपीने याबद्दल पंतप्रधानांची कृतज्ञता व्यक्त केली होती. ज्या घटनेकडे अनेक वर्षांच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये एक दुर्मिळ आणि सकारात्मक हावभाव म्हणून पाहिले गेले.

ब्रेकिंग : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटणाऱ्या पांडेंची पक्षातून हकालपट्टी; वाघ यांनाही बाहेरचा रस्ता

युनूस सरकार आणि जमातपासून अंतर

तारिक रहमान यांनी युनूस सरकारसोबत असलेले मतभेद व्यक्त केले असून अंतरिम सरकारच्या दीर्घकालीन परराष्ट्र धोरणाच्या निर्णयांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचप्रमाणे जमात-ए-इस्लामीवर टीका करत निवडणुकीत युती करण्यास साफ नकार दिला आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच लंडनमध्ये असलेल्या तारिक रहमान यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट घोषणेपासून प्रेरित बांगलादेश फर्स्ट परराष्ट्र धोरणाची मागणी केली होती. ना दिल्ली, ना पिंडी, बांगलादेश पहले असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ज्यावरून हे स्पष्ट होतं की, रावळपिंडी किंवा दिल्लीच्या जवळ जाण्याचे धोरण आम्ही स्वीकारणार नाही.

तारिक रहमान यांची घरवापसी

तारिक रहमान यांचे ढाका येथील आगमन भव्य असे होते. विमानतळ ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आलेल्या रोड शोमध्ये बीएनपीचे सुमारे ५० लाख कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. तारिक रहमान बोगुरा 6 (सदर) या जागेवरून, तर पक्षाच्या प्रमुख खालिदा झिया या बोगुरा 7 (गबताली शाजहानपूर) मधून निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टरतावादी घटक या ताकदीच्या प्रदर्शनावर खूश नाहीत आणि निवडणुकीपूर्वी बीएनपी आणि जमात यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. सरकारने गुरुवारी उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था नेमली होती. स्थानिक माध्यमांनुसार, सुमारे 3 लाख समर्थक 10 विशेष गाड्यांमधून राजधानीत पोहोचले असून ज्याचे वर्णन बीएनपीने ‘ऐतिहासिक गर्दी’ म्हणून केले.

बिबट्या दिसताच वाजणार सायरन; नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाची अत्याधुनिक ‘एआय’ प्रणाली

कोण आहे तारिक रहमान

तारिक रहमान हा माजी राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांचा मुलगा असून 2008 पासून लंडनमध्ये राहत आहे. शेख हसीना सरकारच्या काळात त्यांना अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते, ज्याचे बीएनपीने राजकीय षडयंत्र म्हणून वर्णन केले होते. 2007 मध्ये, त्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर गंभीर आरोग्य समस्या आणि अटकेदरम्यान छळ केल्याचा आरोप होता. 2008 मध्ये त्यांना जामीन मिळाला आणि त्यांना उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी मिळाली, तेव्हापासून ते तिथेच राहत होते.

2004 च्या ढाका ग्रेनेड हल्ल्याप्रकरणीही त्यांना गैरहजेरीत शिक्षा सुनावण्यात आली होती. या हल्ल्यात 24 जण ठार झाले, तर शेख हसीना थोडक्यात बचावल्या होत्या. 2001-06 च्या BNP राजवटीत भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अहवालांच्या 2008 च्या ढाका ट्रिब्यून मालिकेत, त्यांचे वर्णन ‘डार्क प्रिन्स’ म्हणून करण्यात आले. मात्र, गेल्या वर्षभरात न्यायालयाने सर्व मोठ्या खटल्यांत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Exit mobile version