गोपनीयतेच्या अनुषंगाने सचिवालयाचे नवे निर्देश; संसद परिसरात स्मार्ट गॅजेट वापरण्यावर बंदी
लोकसभा सचिवालयाने खासदारांना संसद परिसरात स्मार्ट चष्मा, पेन कॅमेरा आणि स्मार्ट घड्याळे यासारखी स्मार्ट उपकरणे न वापरण्याचे केले आवाहन.
Ban on using smart gadgets in Parliament premises : संसदेची सुरक्षा आणि गोपनीयता अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा सचिवालयाने खासदारांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बुधवारी जारी केलेल्या बुलेटिनद्वारे, लोकसभा सचिवालयाने खासदारांना संसद परिसरात स्मार्ट चष्मा, पेन कॅमेरा आणि स्मार्ट घड्याळे यासारखी स्मार्ट उपकरणे(Smart Gadgets) वापरू नयेत, असे आवाहन केले आहे. सचिवालयाचे म्हणणे आहे की अशा उपकरणांमुळे खासदारांच्या गोपनीयतेला धोका पोहोचू शकतो आणि संसदेच्या(Parliament) विशेषाधिकारांचे उल्लंघन देखील होऊ शकते.
लोकसभेने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असे सांगण्यात आले की, आजकाल देशात अनेक प्रकारची आधुनिक आणि प्रगत डिजिटल उपकरणे सहज उपलब्ध आहेत. यामध्ये स्मार्ट चष्मा, कॅमेरा असलेले पेन आणि स्मार्ट घड्याळे यांचा समावेश आहे, ज्यांचा गैरवापर होऊ शकतो.
देश हादरला! कर्नाटकमध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात 17 जणांचा जागीच मृत्यू, 21 प्रवासी जखमी
सचिवालयाने चेतावणी दिली की गुप्त रेकॉर्डिंग किंवा पाळत ठेवण्यासाठी काही उपकरणे वापरली जाऊ शकतात. याचा परिणाम संसदेत होणाऱ्या चर्चेवर आणि खासदारांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेवर होऊ शकतो. त्यामुळे खासदारांना संसद भवन आणि संपूर्ण संसद संकुलात अशा कोणत्याही उपकरणाचा वापर करू नये, ज्यामुळे सुरक्षा, गोपनीयता आणि संसदीय शिष्टाचाराला हानी पोहोचू शकते.
