Pennsylvania Plane Crash : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत (America) मोठ्या प्रमाणात विमान अपघात (Plane Crash) होत आहे. यातच आणखी एक विमान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, पेनसिल्व्हेनियामध्ये (Pennsylvania) एक छोटे विमान पार्किंग क्षेत्रात कोसळले आणि जमिनीवर आदळले. जमिनीवर आदळताच विमानाचा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. आगीच्या भीषण ज्वाळांनी परिसरातील झाडांनाही वेढले. स्फोटचा अवाज ऐकताच लोक धावत आले. धुरमुळे अनेकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात एकाच कुटुंबातील 5 सदस्य होते, परंतु ते आता जिवंत आहे की नाही याबाबात कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. तर दुसरीकडे विमानातील पाचही जणांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडिायावर व्हायरल होत आहे.
BREAKING:
**”Shocking Plane Crash Rocks Pennsylvania: Ambulances Race to Save Lives in Fiery Chaos!”**
A light aircraft crashed into a residential area in Manheim Township, Pennsylvania, near Lancaster Airport today, March 9, 2025, sparking a massive emergency response. Medics… pic.twitter.com/SnkKIiWfW4
— Mila Joy (@MilaLovesJoe) March 9, 2025
अनेक जण जखमी
या अपघाताबाबत हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विमान अपघात लँकेस्टर विमानतळाजवळील पेनसिल्व्हेनियातील मॅनहाइम टाउनशिपमध्ये भारतीय वेळेनुसार 09 मार्च रोजी दुपारी 3.18 वाजता झाला. विमान जळताना पाहण्यासाठी फेअरव्ह्यू ड्राइव्ह आणि मीडोव्ह्यू कोर्टवर गर्दी जमली होती. विमानाच्या मागील भागासह सर्व मलबे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये पडले, ज्यामुळे अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मॅनहाइम टाउनशिपचे (Manheim Township) अग्निशमन प्रमुख स्कॉट लिटिल म्हणाले की, हे विमान सिंगल-इंजिन बीचक्राफ्ट बोनान्झा होते जे मॅनहाइम टाउनशिपमधील ब्रेदरन व्हिलेज रिटायरमेंट कम्युनिटी सेंटरजवळ कोसळले. अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये विमानाचे अवशेष ज्वाळा आणि काळ्या धुराने वेढलेले दिसत आहेत.
अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार; महायुती सरकारकडून कुणाला काय मिळणार?
अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. एफएए टीमने पुरावे गोळा केले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.