Download App

Pakistan Terror Attack: मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, 8 जवानांचा मृत्यू

Pakistan Terror Attack: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pakistan Terror Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये 8 जवानांचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

Pakistan Terror Attack: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pakistan Terror Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये 8 जवानांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना टार्गेट केले होते. या हल्ल्यात 8 जवानांचा मृत्यू झाला तर 2 जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात आठ पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाले तर दोन जण जखमी झाले. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुर्रम या आदिवासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात कायद्याची अंमलबजावणी करणारे आठ अधिकारी ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.

तर दुसरीकडे जमात-उल-अहरार या प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या फुटलेल्या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र आतापर्यंत पाकिस्तानी आर्मीकडून याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

नवरात्र उत्सव; दांडीया स्पर्धेला कोपरगावात अभिनेत्री मानसी नाईक हजेरी लावणार

शनिवारी देखील पाकिस्तानमध्ये झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह सहा सैनिक आणि अनेक अतिरेकी मारले गेले होते. टीटीपीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

Bigg Boss Marathi 5 Winner : मोठी बातमी, सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता

follow us