Download App

PM मोदी अन् मस्कच्या भेटीत टेस्लाच्या भारतातील ग्रँड एन्ट्रीचा प्लॅन ठरला; Linkedin वर निघाली बंपर भरती

एलन मस्क यांनी भारतासाठी खास प्लॅन तयार केला आहे. कंपनीने सुरुवातीलाच भारतासाठी दोन हजार जागांच्या भरतीवर शिक्कामोर्तब केले.

Tesla Power India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) अमेरिका दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि उद्योजक एलन मस्क यांचीही (Elon Musk) भेट घेतली. यानंतर एलन मस्क यांनी भारतासाठी खास प्लॅन तयार केला आहे. कंपनीने सुरुवातीलाच भारतासाठी दोन हजार जागांच्या भरतीवर शिक्कामोर्तब केले आहे. जर तुमच्याकडे इंजिनिअरींग, सेल्सचा अनुभव असेल तर तुम्ही देखील या जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे कर्मचारी होऊ शकता.

आगामी काळात बॅटरी तयार करणारी कंपनी टेस्ला पावर इंडिया (Tesla Power India) भारतात विस्तारीकरण करणार आहे. कंपनी विस्तारीकरणाच्या योजनेत नवीन कर्मचारी भरतीवर विचार करत आहे. सोमवारी कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनातून ही माहिती समोर आली आहे.

सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk झाला 12 व्या मुलाचा बाप! सोशल मीडियावर दिली खुशखबर

कंपनीने आपल्या जुन्या बॅटरींची दुरुस्ती करून विक्री करण्यासाठी आपला बॅटरी ब्रँड रिस्टोर करण्याचा प्रोजेक्ट लाँच केला आहे. सन 2026 पर्यंत देशभरात रिस्टोर ब्रँडचे पाच हजार शॉप उघडण्याचे नियोजन आहे. कंपनीचे प्रबंध निदेशक कविंदर खूराना यांनी सांगितले की भारतात व्यापार विस्तार सुरुच राहणार आहे. या क्रमात आम्ही इनोवेशनच्या माध्यमातून टिकाऊ उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींची काय भूमिका आहे याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही आमच्या टीममध्ये नवीन प्रतिभाशाली व्यक्तींचे स्वागत करण्यास सज्ज आहोत.

या पदांसाठी होणार भरती

टेस्ला कंपनीने भारतात 13 विविध पदांसाठी भरती करण्याचे नियोजन सुरू केले आहे. या संदर्भात एक पोस्ट लिंक्डइन पेजवर शेअर करण्यात आली आहे. कंपनीला कस्टमर फेसिंग आणि बॅक एंड सहीत 13 पदांसाठी कर्मचारी हवे आहेत. दिल्ली आणि मुंबईत कंपनी 5-5 कर्मचारी भरती करण्याची तयारी करील. ही भरती सल्लागार, सर्व्हिस टेक्निशियन या पदांसाठी असेल. कस्टमर इंगेजमेंट मॅनेजर, डिलीव्हरी ऑपरेशन स्पेशालिस्ट या पदांची भरती फक्त मुंबईसाठीच आहे.

follow us