Snake frozen inside ice cream bar : आइस्क्रिम खाण्याची आवड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. पण याच आइस्क्रिममध्ये साप निघाला तर.. ऐकूनच घाबरायला होतं. पण हा प्रसंग खरा आहे. एका व्यक्तीने मोठ्या आवडीने आइस्क्रिम खरेदी केले. पण खायच्या आधीच त्याला यात साप गोठलेल्या अवस्थेत दिसला. या व्यक्तीने हे आइस्क्रिम रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विक्रेत्याकडून खरेदी केले होते. या व्यक्तीने त्याच्या फेसबूकवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून लोकांनाही मोठा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार थायलंडमधील मुआंग रत्चाबुरी भागात ही धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी रेबान नकलेंगबून नावाच्या व्यक्तीने आइस्क्रिम खरेदी केले. यात त्याला काळा आणि पिवळा साप दिसला. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी या आइस्क्रिमचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले. या फोटोसह थाई भाषेत त्यांनी “इतके मोठे डोळे! हा साप खरंच मेला आहे का? ब्लॅक बीन, रस्त्यावरचा विक्रेता. हा खरा फोटो आहे कारण मी स्वतः विकत घेतलेल्या आइस्क्रिमचा हा फोटो आहे.” असे लिहीले आहे.
सावधान! फेसबूक, ईमेल अन् कॉम्प्यूटर.. आयकर विभाग सगळंच तपासणार, पण का?
ब्लॅक बीन थायलंडमधील एक प्रसिद्ध आइस्क्रीम आहे. लोकांकडून हे आइस्क्रीम आवडीने खाल्ले जाते. नाकलेंगबून यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये फोटो शेअर केले आहेत. यात काळा आणि पिवळ्या रंगाचा साप स्पष्ट दिसून येत आहे. सापाचे डोके स्पष्ट दिसत आहे. हा साप थोडा विषारी गोल्डन ट्री स्नेक (क्रिसोपोलिया ऑर्नाटा) असू शकतो असा अंदाज सोशल मिडिया युजर्स व्यक्त करत आहेत.
या पोस्टवर आतापर्यंत हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील काही प्रतिक्रिया अत्यंत भीतीदायक आहेत. तर काही जणांकडून या प्रकाराची मस्करीही केली जात आहे. एका युजरने लिहीले की याचमुळे मी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांतून खाद्य पदार्थ घेत नाही. दुसऱ्याने लिहीले की ठीक आहे ना तुम्हाला आइस्क्रीम सोबत काही एक्स्ट्रा प्रोटीनही मिळाले. तिसऱ्याने लिहीले की पहिली बाईट चांगली वाटेल पुढील बाईट मात्र तुम्हाला थेट रुग्णालयातच धाडील.
थायलंड, श्रीलंकेनंतर आता मलेशियाने भारतीयांना दिली व्हिसा फ्री एंट्री, जाणून घ्या कारण?