Singapore : सिंगापुरात जवळपास एक वर्षानंतर झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे के.थरमन शणमुगारत्नम यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत शणमुगारत्नम यांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त मिळाली. सिंगापूर निवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली. याआधी शुक्रवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केले होते. त्रिशंकू सामन्यात शणमुगारत्मही मैदानात होते. सकाळी आठ वाजल्याापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्या होत्या. दरम्यान, याबाबत शनिवारपर्यंत अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे.
विद्यमान राष्ट्रपती हलिमा याकूब यांचा कार्यकाळ 13 सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे. त्या देशाच्या आठव्या राष्ट्रपती आहेत. तर या पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. सिंगापुरात 2017 मधील राष्ट्रपती निवडणूक एक आरक्षित निवडणूक होती. यामध्ये फक्त मलय समुदायाच्या सदस्यांनाच निवडणूक लढण्याची परवानगी होती. या दरम्यान दुसरा कोणताही उमेदवार नसल्याने हलीमा यांना नामित करण्यात आले होते. सिंगापूरमध्ये 2011 नंतर राष्ट्रपतीपदासाठी ही पहिलीच निवडणूक होती.
Tharman Shanmugaratnam, a former member of Singapore's ruling party, has won the country's presidential race with 70.4% of the vote, the election department announced on Saturday: Reuters
(File photo) pic.twitter.com/ixrEXMKjGU
— ANI (@ANI) September 1, 2023
शणमुगारत्नम यांचा जन्म सिंगापुरात झाला आहे. त्यांनी मागील महिन्यात राष्ट्रपतीपदासाठी मोहिमेला सुरुवात केली होती. 2001 मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले होते. त्यांनी सत्ताधारी पीपुल्स अॅक्शन पार्टी बरोबर मंत्रीपदी काम केले आहे.