Canada General Election : कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतविरोधी जगमीत सिंग यांच्या एनडीपी (NDP) पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. हा पराभव इतका मोठा आहे की या पराभवासोबतच एनडीपी पक्षाने आपला राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. ज्यामुळे जगमीत सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Election) कॅनडा निवडणूक 2025 चे निकाल आल्यानंतर जगमीत सिंग यांचा नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी (NDP) पक्ष 12 जागाही जिंकू शकलेला नाही.
सिंग यांना जिथे सुमारे 27 टक्के मते मिळाली, तिथे चांग यांना 40 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. जगमीत सिंग यांच्या पक्षात मोठी घसरण दिसून आली असून, पक्ष आपला राष्ट्रीय दर्जा गमावण्याच्या मार्गावर आहे, ज्यासाठी पक्षांना किमान 12 जागा जिंकाव्या लागतात. यामध्ये एनडीपीला यश मिळू शकले नाही. कौलानुसार लिबरल पार्टी 165 जागांवर आघाडीवर आहे, तर खलिस्तानी नेते (मानले जाणारे) जगमीत सिंग निवडणूक हरले आहेत.
पाकिस्तानने हत्यारे लोड केली अन्.. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान भेदरला
जगमीत सिंग यांच्यासोबतच माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनाही मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर लिबरल पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळाली आहे. मागील निवडणुकीत एनडीपीला 24 जागा मिळाल्या होत्या. त्यांच्या पाठिंब्यानेच जस्टिन ट्रुडो यांनी बराच काळ आपले सरकार चालवले. आपले सरकार चालवण्यासाठी ट्रुडो जगमीत सिंग यांचा पाठिंबा घेत राहिले होते.
कॅनडात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मार्क कार्नी (Mark Carney) पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत. कॅनडात लिबरल पार्टीने सलग चौथ्यांदा सरकार बनवण्यात यश मिळवलं आहे. खलिस्तान समर्थक मानले जाणारे न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी) चे प्रमुख जगमीत सिंग यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.