Vidhan Parishad Election : निवडणूक बिनविरोध होणार ? पण महायुतीत फडणवीसांची कसोटी लागणार

Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पाच रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानपरिषदेचे पाच सदस्य विधानसभेवर (Maharashtra Assembly) निवडून गेलेले आहेत. या जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आहेत. शिवाय लोकसभा, विधानसभेला डावलेले गेलेले नाराज असलेल्या काही जणांना संधी मिळू शकते.
सावरकर-गोळवलकरांकडून संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह लिखान, फडणवीस त्यांच्या विचारांचे पाईक; सपकाळांचा आरोप
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमश्या पाडवी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. तर भाजपचे गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके हे विधानपरिषदेचे सदस्य होते. तिघेही विधानसभेचे आमदार झाले आहे. रिक्त झालेल्या पाचही जागा महायुतीच्या आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीतील तिन्ही मोठे पक्ष, छोटे पक्ष व अपक्ष म्हणून 238 आमदार आहेत. तर भाजपकडे 132, शिवसेनेकडे 57 आणि राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत. तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत. त्यात शिवसेनेकडून सर्वाधिक 20, काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादीकडे दहा आमदार आहेत.
थांबू नका…’लवकरच मुले जन्माला घाला’; तामिळनाडूच्या मु्ख्यमंत्र्यांचं फर्मान, बैठकच बोलावली
रिक्त झालेल्या पाचही जागा महायुतीच्या आहेत आणि आमदारांचे संख्याबळही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप तीन जागा, एकनाथ शिंदे व अजित पवार हे प्रत्येकी एक जागा निवडून आणू शकतात. तर महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. त्यामुळे तेही एकही जागा निवडून आणू शकत नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. त्यात महायुतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे महाविकास आघाडीला दिल्यास ही निवडणूक होणार नसल्याची राजकीय चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीसांची लागणार कसोटी
या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची संख्या नक्कीच जास्त असणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत डावलेले गेलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजपकडून विधानपरिषदेची संधी मिळविण्यासाठी अनेक जण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लॉबिंग करतील. त्यामुळे नावे अंतिम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची जास्त कसरत होणार आहे.