Donald Trump On Pakistani PM : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. त्यांनी आता भारत पाकिस्तान यांच्यात सुरु असणाऱ्या तणावाबाबत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर मी हस्तक्षेप केला नसता तर भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात 3 कोटींहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले असते. याचबरोबर मोठा दावा करत ट्रम्प म्हणाले की, जर मी हस्तक्षेप केला नसता तर पाकिस्तानी पंतप्रधान मारले गेले असते. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर आता पुन्हा राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. भारतात विरोधक पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल करत आहे.
स्टेट ऑफ द युनियन (State of the Union) भाषणात बोलताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, भारताचे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी हस्तक्षेप करून 3 कोटींहून अधिक लोकांचे जीव वाचवले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांना सांगितले की जर त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर 3 कोटी 50 लाख लोक मृत्युमुखी पडले असते. आम्हाला देशांतर्गत आणि परदेशात अमेरिकन लोकांची सुरक्षा पुनर्संचयित करण्याचा अभिमान आहे. माझ्या पहिल्या दहा महिन्यांत मी आठ युद्धे संपवली. पाकिस्तान आणि भारत यांच्यात अणुयुद्ध सुरू झाले असते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या संघर्षांना सोडवल्याचा दावा केला आहे त्यात इस्रायल आणि हमास, इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथिओपिया, भारत आणि पाकिस्तान, सर्बिया आणि कोसोवो, रवांडा आणि काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, आर्मेनिया आणि अझरबैजान आणि कंबोडिया आणि थायलंड यांचा समावेश आहे. त्यांनी असेही म्हटले की त्यांचे प्रशासन रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.
#WATCH | Addressing the 2026 State of the Union, United States President Donald Trump says, “… In my first 10 months, I ended eight wars… Pakistan and India would have had a nuclear war. 35 million people said the Prime Minister of Pakistan would have died if it were not for… pic.twitter.com/GnrgJKtjID
— ANI (@ANI) February 25, 2026
तर दुसरीकडे गेल्या वर्षी 10 मे पासून त्यांनी 80 पेक्षा जास्त वेळा भारत-पाकिस्तान संघर्ष संपवण्याचे श्रेय घेतले आहे. मे 2025 मध्ये झालेल्या संघर्षादरम्यान कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाचे सर्व दावे भारताने सातत्याने नाकारले आहेत.
अवकाळीचं संकट कायम,’या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अलर्ट जारी-
दोन्ही सैन्याच्या महासंचालकांमध्ये थेट चर्चेनंतर पाकिस्तानसोबत संघर्ष संपवण्याचा करार झाल्याचे भारताने म्हटले आहे मात्र तरी देखील डोनाल्ड ट्रम्प दावा करत असल्याने विरोधक पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल करत आहे.
