Download App

अयोध्येनंतर ‘या’ मुस्लिम देशात उभारलं जातंय भव्य मंदिर, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Abu Dhabi Hindu Temple : UAE ची राजधानी अबुधाबी (Abu Dhabi) मधील पहिल्या हिंदू मंदिराचे (Hindu Temple) उद्घाटन फेब्रुवारीमध्ये होणार आहे. मंदिराच्या निर्मतीचा उद्देश प्रेम आणि सद्भाव आहे. हे मंदिर गुलाबी खडक आणि पांढऱ्या संगमरवरीपासून बनलेले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या लोकांनी दिली. येत्या 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हे मंदिर BAPS स्वामीनारायण संस्थेने बांधले आहे. या घटनेचे वर्णन UAE आणि नागरिक यांच्यातील सर्वसमावेशकतेचे लक्षण असल्याचे स्वामीनारायण संस्थेने म्हटले आहे.

सद्भाव आणि सहिष्णुता हा UAE चा आत्मा असल्याचे BAPS आंतरराष्ट्रीय संबंध प्रमुख स्वामी ब्रह्मबिहारीदास यांनी म्हटले. मंदिराच्या बांधकामाला परवानगी दिल्याबद्दल त्यांनी यूएई सरकारचे आभार मानले. ते पुढं म्हणाले, ‘हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. परंतु BAPS हिंदू मंदिराचा मूळ विचार या पृथ्वीवर एकोपा वाढवणे आहे. हे मंदिर शांतता आणि UAE आणि भारत यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक असेल.

मंदिरासाठी दान केली जमीन
यूएईचे संस्थापक, दिवंगत शेख झायेद बिन सुलतान अल नाह्यान यांच्यापासून राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद यांनी मंदिरासाठी केलेल्या मदतीची स्वामी ब्रह्मबिहारीदास यांनी प्रशंसा केली. राष्ट्रपतींनी युवराज असताना मंदिरासाठी जमीन दिली होती. यूएईचे अध्यक्ष मोठ्या मनाचे नेते आहेत असेही त्यांनी म्हटले.

कोस्टल रोडची आयडिया ठाकरेंची! मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनापूर्वी आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड

स्वामी ब्रह्मबिहारीदास म्हणाले, ‘पीएम मोदींच्या उपस्थितीत 2018 मध्ये आम्ही त्यांच्यासमोर दोन पर्यंत मांडले होते. एक पारंपारिक पद्धतीची इमारत असलेले मंदिर अन् दुसरे दगडी बांधकाम असलेले बांधकाम. आम्ही त्यांना विचारले की यापैकी कोणते बनवावे. यावर ते हसले आणि म्हणाले की तुम्ही मंदिर बांधत असाल तर ते मंदिरासारखे दिसले पाहिजे.

नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात? शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सांगितला PM मोदींचा प्लॅन ?

मंदिर किती मोठे आहे?
युएईमध्ये 5.4 हेक्टर जमिनीवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. कम्युनिटी हॉल आणि पार्किंग क्षेत्र समाविष्ट करण्यासाठी नंतर ते 11 हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले आहे. भारतातील कारागिरांनी खडक आणि संगमरवरीमधून हे मंदिर कोरले आहे. भारतात कोरलेले दगड यूएईला पाठवले आणि नंतर एकत्र जोडले गेले. प्राचीन मंदिरांचे बांधकाम लक्षात घेऊन त्यात लोखंड आणि स्टीलचा वापर केलेला नाही. आता मंदिराच्या उद्घाटनाला केवळ दोन आठवडे उरले आहेत. मुख्य मंदिराच्या जागेवरून क्रेन आणि मोठी यंत्रसामग्री हटवण्यात आली आहे.

PM मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर! आचारसंहितेपूर्वी मुंबई, पुण्यात लावणार उद्घाटनांचा धडाका

follow us