Turkeys Erdogan Support Pakistan Against India : भारत आणि पाकिस्तानमध्ये (Turkeys Support Pakistan) युद्धबंदी करण्याचा निर्णय झालाय. परंतु अजून दोन्ही देशांमधील वाद अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही.दहशतवादाच्या विरोधातील या लढ्यात अनेक देशांनी भारताची साथ दिली, तर काही देश पाकिस्तानच्या बाजूने (Operation Sindoor) आहे. यामध्ये तुर्कीनेही भारताविरुद्ध आवाज उठवला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला.
Video : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला पुणेकरांचा दणका; 1500 कोटींची डील कॅन्सल
दरम्यान आता तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी (Turkeys Erdogan) आज इस्लामाबादला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला. तसेच अंकारा (तुर्कीची राजधानी) चांगल्या आणि वाईट काळातही तुमच्या पाठीशी उभा राहील, असं आश्वासन त्यांनी पाकिस्तानला दिलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या एक्सवरील पोस्टला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य (India Pak War) केलंय. तिथे शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानला ‘मजबूत पाठिंबा आणि अटळ एकता’ दिल्याबद्दल एर्दोगान यांचे आभार मानले आहेत.
Kıymetli @CMShehbaz kardeşim,
Dünya üzerinde pek az millete nasip olan Türkiye-Pakistan kardeşliği, hakiki dostluğun en güzel örneklerinden biridir.… https://t.co/NePsq2Lr3O
— Recep Tayyip Erdoğan (@RTErdogan) May 13, 2025
रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, तुर्की आणि पाकिस्तानमधील बंधुत्व जे जगातील फार कमी राष्ट्रांमध्ये आढळते. ते खऱ्या मैत्रीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तुर्की या नात्याने आम्ही पाकिस्तानच्या शांतता, शांतता आणि स्थिरतेला खूप महत्त्व देतो. वाद सोडवण्यासाठी संवाद आणि तडजोडीला प्राधान्य देणाऱ्या पाकिस्तानी राज्याच्या समजूतदार, संयमी धोरणाचे आम्ही कौतुक करतो.
आम्ही भूतकाळात आणि भविष्यातही जसे आहोत, तसेच चांगल्या आणि वाईट काळातही तुमच्या पाठीशी राहू. तुमच्या माध्यमातून, मी आमच्या मैत्रीपूर्ण आणि बंधुत्वाच्या पाकिस्तानला माझ्या मनापासून प्रेमाने शुभेच्छा देतो. पाकिस्तान, तुर्की दोस्ती जिंदाबाद!
माझे प्रिय बंधू राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचा पाकिस्तानला असलेला भक्कम पाठिंबा आणि अढळ एकता मला खूप भावली आहे. पाकिस्तानला तुर्कीयेसोबतच्या संकटाच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आणि टिकाऊ बंधुत्वाच्या संबंधांचा अभिमान आहे, ते प्रत्येक नवीन आव्हानासोबत अधिक मजबूत होतात. दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महामहिमांच्या रचनात्मक भूमिकेबद्दल आणि दृढ प्रयत्नांबद्दल मी विशेषतः आभारी आहे. आपल्या दोन्ही देशांसाठी आणि लोकांसाठी उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य घडविण्यासाठी आपण एकत्र काम करत असताना पाकिस्तान आणि तुर्कीमधील बंध अधिक मजबूत आणि बहरत राहोत, असं शरीफ यांनी X पोस्टमध्ये म्हटलं आहे.