Bomb Blast In Southwestern Pakistan : पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. (Bomb Blast) जखमींमध्ये सात पोलिसांचाही समावेश आहे. हा हल्ला रिमोट कंट्रोल बॉम्बने करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हा बॉम्ब एका मोटारसायकलमध्ये बसवण्यात आला होता, ज्याचा दक्षिण पाकिस्तानातील पिशीन येथील पोलीस मुख्यालयाजवळ स्फोट झाला.
Telegram : मोठी बातमी! टेलिग्रामचे संस्थापक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव यांना अटक
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान दहशतवादविरोधी विभाग (CTD) आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी तपासासाठी तैनात करण्यात आलं आहे. कोणत्याही गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारली नसली तरी, या भागातील नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करणाऱ्या फुटीरतावादी गटांकडून वाढत्या हिंसाचाराशी त्याचा संबंध असल्याचे संकेत मिळत आहेत.
Pakistan: Two children among three killed in bomb blast in Balochistan market
Read @ANI Story | https://t.co/9GQozp3GVt#Pakistan #Balochistan #bombblast pic.twitter.com/HHqEHWNt2B
— ANI Digital (@ani_digital) August 24, 2024