अमेरिका-इराण करारावर आज स्वाक्षरी, Strait of Hormuz सर्वांसाठी खुले होणार? डोनाल्ड ट्रम्प करणार मोठी घोषणा

Donald Trump :  संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका आणि इराण करारावर आज स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. आज दोन्ही देशांमध्ये करार होणार

Donald Trump

Donald Trump

Donald Trump :  संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका आणि इराण करारावर आज स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. आज दोन्ही देशांमध्ये करार होणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे याबाबत इराणकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिकेबरोबर करार पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार असं इराणकडून सांगण्यात येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्ट चर्चेत

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टृुथ सोशल मीडियावर पोस्ट केले की, अमेरिका (America) आणि इराण (Iran) रविवारी 14 जून रोजी स्वाक्षरी करणार आहे. करारावर स्वाक्षरी होताच युद्ध संपेल आणि स्टेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz ) पुन्हा एकदा संपूर्ण जगासाठी खुले केले जाईल असं ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. तर दुसरीकडे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने करार झाल्याची माहिती देत स्वाक्षरीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याची माहिती दिली आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानने देखील मोठा दावा केला आहे. या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रामध्ये करार झाला असून रविवारी करारावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षरी करण्यात येणार आहे.

अमेरिका पैसे देणार नाही – ट्रम्प यांचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी टृुथ या सोशल मीडियावर लिहिले की, अमेरिका करारानुसार इराणला एकही पैसा देणार नाही. परिस्थिती सामान्य झाल्यावर इराणचे संवर्धित युरेनियम नष्ट केले जाईल. भविष्यात अमेरिका इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेसोबत चांगले संबंध प्रस्थापित  करेल. जर असं झालं नाही तर अमेरिकेकडे एक पर्याय उपलब्ध आहे ज्याचा वापर करुन इराणला जगाच्या नकाशावरुन पूर्णपणे नष्ट करुन टाकेल असं देखील ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

14 ते 20 जून कुंभ राशींसह ‘या’ राशींना होणार बंपर फायदा, मिळणार आर्थिक लाभ

लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच

तर दुसरीकडे इस्त्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, शनिवारी झालेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर हिजबुल्लाने उत्तर इस्त्रायवर प्रत्युत्तरात हल्ले केले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Exit mobile version