युद्ध संपलं, करार फक्त औपचारिकता’; ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्याने खळबळ, पण इराणकडून अद्याप हिरवा कंदील नाही

गेल्या 66 दिवसांत ट्रम्प यांनी तब्बल 39 वेळा इराणसोबतच करार अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 80

Trump’s new statement sparks a stir : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराण आणि अमेरिकेदरम्यान लवकरच करार होणार असल्याचा दावा केला आहे. येत्या दोन दिवसांत दोन्ही देशांमध्ये समझोता होऊन त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या या दाव्यामुळे जगभरात एकाच प्रश्न उपस्थित होत आहे की,न्यावेळी तरी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा का?

यामागचं कारण देखील तसंच आहे. गेल्या 66 दिवसांत ट्रम्प यांनी तब्बल 39 वेळा इराणसोबतच करार अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले आहे. यावेळी तर त्यांनी संघर्ष संपुष्टात आल्याचा दावा करत करारावर स्वाक्षऱ्या होणे केवळ औपचारिकता उरल्याचे म्हटले आहे. इराण-अमेरिका संघर्षाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असतानाच ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे. गुरुवारी त्यांनी सांगितलं की, या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार-रविवारी दोन्हो देश एका महत्वपूर्ण करारावर सहमत होऊ शकतात.

जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट या करारातून होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका आणि इराण यांच्यात एका मजबूत सामंजस्य करारावर तत्वतः सहमती झाली आहे. या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी उप्राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांना पाठवण्याचा विचार देखील त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे, ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सावध भूमिका घेतली आहे. सरकारी दूरचित्रवाणीशी बोलताना मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, चर्चा सुरू असली तरी संघर्ष समाप्त करण्यासाठी कोणताही अंतिम करार झालेला नाही. दोन्ही देशांमध्ये अद्याप सहमती झालेली नाही.

मुख्यमंत्रीपदाची ऑफर, शरद पवारांप्रती निष्ठा आणि गमावलेली संधी; भुजबळांच्या वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया

दरम्यान, अमेरिकन वृत्तवाहिनी CNN च्या विश्लेषणानुसार, गेल्या 66 दिवसांत ट्रम्प यांनी किमान 39 वेळा करार लवकरच होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या ताज्या वक्तव्याकडे देखील अनेकजण साशंक नजरेने पाहत आहेत. या घडामोडींवर भाष्य करताना आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे उपाध्यक्ष हर्ष पंत यांनी सांगितले की, ट्रम्प सध्या नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करत आहेत हे समजणे कठीण आहे. इराणने अद्याप कोणत्याही कराराला मान्यता दिलेली नाही. गेल्या काही दिवसांत ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची भूमिका घेतली, मात्र त्यानंतर त्यांनी माघार घेत कराराच्या शक्यतेबाबत बोलणे सुरू केले.

हर्ष पंत यांच्या मते, खाडीतील सहयोगी देशांच्या दबावामुळे ट्रम्प यांनी आपली रणनीती बदलली असावी. कारण इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ला झाल्यास तेथील सैन्य बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियामधील अमेरिकी तळांना लक्ष्य करू शकते. त्यामुळे संपूर्ण प्रदेशातील स्थैर्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी इराणलाही सध्या आपली भूमिका मजबूत असल्याचे वाटत असून ते आपल्या अटींवर ठाम आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये लवकरच करार होईल, असे निश्चितपणे सांगणे अद्याप शक्य नाही. आणि जरी कराराची घोषणा झाली, तरी तो दीर्घकाळ टिकेल का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असेल.

follow us