Download App

आर्मी हेलिकॉप्टरला धडकलेल्या अमेरिकन एअरलाइन्समधील सर्व 64 जणांचा मृत्यू ? 28 मृतदेह सापडले

US Army Chopper : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अमेरिकन विमानातील सर्व 64 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

  • Written By: Last Updated:

US Army Chopper : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) झालेल्या विमान अपघातामध्ये अमेरिकन एअरलाइन्समधील (American Airlines) सर्व 64 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 28 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवारी रात्री रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळाजवळ हा अपघात झाला होता.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी अधिकृत मृतांच्या संख्येची पुष्टी केलेली नाही, परंतु कॅन्ससमधील अमेरिकन सिनेटर रॉजर मार्शल यांनी संकेत दिले की विमानातील बहुतेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

28 मृतदेह सापडले

माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सने विमानात 60 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स असल्याची पुष्टी केली आहे. तर ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते जे प्रशिक्षणसाठी जात होते. अपघातानंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 28 मृतदेह सापडले आहे. याच बरोबर विमानाचा एक ब्लॅक बॉक्स देखील सापडला असल्याची माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, कॅन्ससमधील विचिटा येथून उड्डाण घेतल्यानंतर प्रवासी विमान रेगन विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना हा अपघात झाला. याबाबत माहिती देताना वॉशिंग्टन डीसी अग्निशमन दलाचे प्रमुख जॉन डोनेली म्हणाले की, 300 हून अधिक बचाव पथकाचे सदस्य बचाव कार्य करत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत कठीण आहे. पाणी खूप थंड आहे आणि जोरदार वारे बचाव कार्यात अडथळा आणत आहेत. असे ते म्हणाले.

तर विमानतळ प्राधिकरणाच्या सीईओंनी सांगितले की, रेगन विमानतळ गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे तज्ञांचे म्हणणे आहे की इतक्या थंड नदीत पडल्यानंतर, एखादी व्यक्ती फक्त  15-30  मिनिटेच शुद्धीवर राहू शकते. तर 1982 मध्ये याच ठिकाणी भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये एअर फ्लोरिडा फ्लाइट 90 पोटोमॅक नदीत कोसळली होती आणि त्यात 74  लोकांचा मृत्यू झाला होता.

युतीमध्ये मलईसाठी मारामारी, फडणवीसांनी वकिली करू नये; नाना पटोलेंचा टोला

follow us