प्रवाशांना धक्का! ख्रिसमसपूर्वी ‘या’ एअरलाइनने अचानक सर्व उड्डाणे केली रद्द

  • Written By: Published:
प्रवाशांना धक्का! ख्रिसमसपूर्वी ‘या’ एअरलाइनने अचानक सर्व उड्डाणे केली रद्द

American Airlines: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार ख्रिसमसपूर्वी (Christmas) अमेरिकन एअरलाइन्सने (American Airlines) आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. एअरलाइन्सने घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक अडचणीमुळे अमेरिकन एअरलाइन्सने सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अमेरिकेतील सर्व उड्डाणे थांबवली आहेत. त्यामुळे हजारो प्रवासी अडकले.

आज सकाळी तांत्रिक समस्येमुळे यूएस फ्लाइट्सवर परिणाम दिसून येत आहे. आमची टीम ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी काम करत आहे आणि प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं अमेरिकन एअरलाइन्सने म्हटले आहे.

माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्स 60 पेक्षा जास्त देशांमध्ये 350 हून अधिक गंतव्यस्थानांसाठी दररोज हजारो उड्डाणे चालवते. त्यामुळे याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.

दुबई की लाहोर… चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल भारत कुठे खेळणार? ICC ने सगळंच सांगितलं

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने एका निवेदनात म्हटले आहे की एअरलाइनने तांत्रिक समस्या नोंदवली आहे. कंपनी तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे. अशी माहिती न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिली आहे.

‘कुणाचाही बाप येवू दे…’, संतोष देशमुख प्रकरणावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या