दुबई की लाहोर… चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल भारत कुठे खेळणार? ICC ने सगळंच सांगितलं

  • Written By: Published:
Champions Trophy 2025

Champions Trophy 2025 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या आयसीसी चम्पियन्स ट्रॉफी 2025 बद्दल (Champions Trophy 2025) आयसीसीने (ICC) मोठी घोषणा करत संपूर्ण वेळापत्रक जाहीर केला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जर भारतीय संघ (Team India) या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलं तर या स्पर्धेचा अंतिम सामना दुबई येथे खेळला जाणार आहे. आणि जर भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलं नाही तर या स्पर्धेचा अंतिम सामना कराचीमध्ये खेळला जाणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. तसेच 10 मार्च रोजी आयसीसीने अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव देखील ठेवला आहे. तर दुसरीकडे एक सेमीफायनल दुबई आणि दुसरा सेमीफायनल लाहोरमध्ये होणार आहे.

तसेच या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून आयसीसीने प्रत्येकी चारच्या दोन गटात संघाची विभागणी केली आहे. 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्यापासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. याच बरोबर पाकिस्तानच्या 3 शहरांमध्ये सामने होणार आहेत. यामध्ये लाहोर, रावळपिंडी आणि कराची येथे सामने होणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.

Champions Trophy 2025 ग्रुप

अ गट – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश

ब गट – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

चॅम्पियन्स ट्रॉफीचे पूर्ण वेळापत्रक

19  फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20  फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई

24  फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25  फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26  फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28  फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च – उपांत्य फेरी 1, -दुबई

5  मार्च – उपांत्य फेरी 2, – लाहोर

8 मार्च – अंतिम – लाहोर/दुबई

‘कुणाचाही बाप येवू दे…’, संतोष देशमुख प्रकरणावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube