Champions Trophy 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? बीसीसीआय म्हणतो, आमचे संबंध …
Champions Trophy 2025 : 2017 नंतर पुन्हा एकदा आयसीसी (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy) आयोजन करणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) देण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India) पाकिस्तानला जाणार का? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासुन सोशल मीडियावर जोरात होत आहे. तर आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आयएएनएसला बीसीसीआच्या (BCCI) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. यामुळे या स्पर्धेचे ठिकाण बदलले जाऊ शकते किंवा ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळली जाऊ शकते. याआधी देखील पाकिस्तानला 2023 आशिया कपचे (Asia Cup) यजमापद देण्यात आले होते मात्र भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळली गेली होती ज्यामुळे भारतीय संघाने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते.
भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका होणार का ?
भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका होणार का ? या प्रश्नाचे उत्तर देखील बीसीसीआयकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका होणार नाही. याच बरोबर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानचा दौराही करणार नाही. यामुळे या स्पर्धेचे ठिकाण बदलले जाऊ शकते किंवा ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळली जाऊ शकते.
बीसीसीआयला पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागणार आहे मात्र सध्या भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले नसल्याने भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता फारच कमी आहे.
मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
तर दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताने त्यांचा संघ पाकिस्तानला पाठवला तर पीसीबी त्यांच्यासोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास तयार असल्याचे काही दिवसापूर्वी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सांगतिले होते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये झाली होती.