Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्याच्या मागणीसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, मनोज जरांगे बीड (Beed) जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठीभेटी करत होते. यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. लोकसभा 2024 निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर होताच ते पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणार आहे. आज बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठीभेटी करताना अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना बीड दौरा अर्धवट सोडावा लागला आहे.
माहितीनुसार, मराठा समाजाच्या गाठीभेटी करताना त्यांना अशक्तपणा आला, त्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सार्वजनिक कार्यक्रमात यापूर्वीही नितीन गडकरींना अनेकदा आलीय भोवळ, जाणून घ्या नेमका त्रास काय ?
एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या गाठीभेटी करत आहे. या दरम्यान ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह इतर भाजप (BJP) नेत्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहे.
सायलेंट व्होटर्सच्या काळजाला हात… मंगळसूत्र अन् संपत्तीवर बोलून मोदींनी निवडणूक फिरवली?
काही दिवसापूर्वी लोकसभा 2024 निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.