US Strikes On Iran : पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराकडून इराणवर जोरदार हल्ले सुरु करण्यात आले आहे. युएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझची सामुद्रधुनी मधील होणारे इराणचे हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता इराण देखील या हल्ल्यांचे प्रत्युत्तर देत असल्याने दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत (Iran) असणारी तात्पुरती युद्धबंदी संपुष्टात आल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अमरिकेकडून जोरदार हल्ले करण्यात येत आहे. तर बहरीन (Bahrain) आणि कुवेत (Kuwait) येथे असणाऱ्या अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा इराणकडून करण्यात येत आहे.
आग्नेय इराणमधील इरानशहर विमानतळावर अमेरिकन लष्कराने केलेल्या हल्ल्यात अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, इराणमधील बंदर अब्बास येथे आठ स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. दोन क्षेपणास्त्रे सिरिक बंदरावर पडली, तर अन्य दोन स्फोट जास्क बंदरावर झाले.
तेलाच्या किमतींवर परिणाम
अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत सुमारे सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील एकूण तेलापैकी सुमारे 20 टक्के तेलाची वाहतूक ‘होर्मुझची सामुद्रधुनी ‘ मधून केली जाते. या सामुद्रधुनीवरील नियंत्रणामुळे इराणला महत्त्वपूर्ण सामरिक लाभ मिळतो.
अंकारा येथे सुरू असलेल्या ‘नाटो’ (NATO) परिषदेदरम्यान बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणसोबत एखादा करार झाला तरी तो टिकेल याची त्यांना खात्री नाही. त्यांनी इराणच्या लोकांना “अत्यंत अप्रामाणिक” असे संबोधले. तरीही, पूर्ण-प्रमाणावरील युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आणि कायमस्वरूपी शांतता करारासाठी वाटाघाटी सुरू राहू शकतात, असे संकेत दिले.
मिथुनसह पाच राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार
या संघर्षामुळे जूनमध्ये करण्यात आलेल्या तात्पुरत्या कराराला धक्का बसत आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांनी या युद्धाची सुरुवात झाली होती.
