Donald Trump : इराण-इस्त्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत अनेक घडामोडी घडता दिसून येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी लष्करप्रमुख जनरल रॅन्डी जॉर्ज यांना हटवून जनरल ख्रिस्तोफर ले यांची नियुक्त केलीयं. ऐन युद्धाच्या वेळीच ट्रम्प प्रशासनेाने हा निर्णय घेतला असल्याने ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणाबाबतचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आलायं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी म्हणत पोलिस अधिकाऱ्यावर रुबाब झाडला; तोतया थेट जेलमध्ये
ट्रम्प यांनी लष्करप्रमुखांचा तातडीने राजीनामा घेतल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इराणमधील युद्ध रणनीतीवरुन देखील लष्कर प्रमुख आणि सरकार यांच्यामध्ये मतभेदाचा देखील मुद्दा उपस्थित केला जात आहे.
नेमका वाद काय?
जनरल रॅन्डी जॉर्ज आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्यात काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरुन मोठा पेच निर्माण झाला होता. हेगसेथ यांनी सुमारे डझनभर अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रोखल्याचा आरोप आहे. यामध्ये प्रामुख्याने कृष्णवर्णीय आणि महिला अधिकाऱ्यांना लक्ष्य केले गेल्याचा दावा अमेरिकन प्रसारमाध्यमांनी केला आहे. ट्रम्प प्रशासनाचे ‘DEI’ धोरण बदलण्याच्या मोहिमेचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.
महाकाव्याचा महाआरंभ: नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’ मधील रामाची पहिली झलक प्रदर्शित!
पश्चिम आशियात इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई सुरू असतानाच अशा प्रकारे सर्वोच्च लष्करी नेतृत्वात बदल करणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. जनरल रॅन्डी जॉर्ज यांच्यासोबतच जनरल डेव्हिड हॉडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांसारख्या इतर अनुभवी अधिकाऱ्यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे. या कारवाईला संरक्षण क्षेत्रातील जाणकार ‘टॉप-डाउन पर्ज’ म्हणजेच वरिष्ठ पातळीवरील शुद्धीकरण मोहीम म्हणून पाहत आहेत.
ट्रम्प प्रशासनाची रणनीती
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे संरक्षण सचिव हेगसेथ यांना लष्करात असे नेतृत्व हवे आहे, जे त्यांच्या विचारसरणीशी पूर्णपणे सुसंगत असेल. युद्धाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अंतर्गत विरोध टाळण्यासाठी हे ‘प्रशासकीय फेरबदल’ करण्यात आल्याचे विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, जनरल ख्रिस्तोफर ले यांची प्रभारी लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
