उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी म्हणत पोलिस अधिकाऱ्यावर रुबाब झाडला; तोतया थेट जेलमध्ये

Pradyumna Srihari Patil-प्रद्युम्न श्रीहरी पाटील हा परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट घुसला. त्याने आपली ओळख अधिकारी म्हणून सांगितले.

  • Written By: Published:
Pradyumna Srihari Patil

पुणे: मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ओएसडी आहे. तुम्ही एका गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही, असं म्हणून थेट पोलिस उपायुक्तावर दबाव आणणाऱ्या तोतया व्यक्ती पोलिसांनी जेरबंद केलाय. पुण्यात ही घटना घडली असून, प्रद्युम्न श्रीहरी पाटील (Pradyumna Srihari Patil) (वय 47, रा. हिंजवडी) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

प्रद्युम्न श्रीहरी पाटील हा परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट घुसला. त्याने आपली ओळख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याचे सांगत अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तो आक्रमकपणे पोलिस अधिकाऱ्यांनी बोलत होता. तुम्ही एका गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही, असा प्रश्न करत अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाटील याच्यावर पोलिस अधिकाऱ्यांना शंका आली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तो कोणीही अधिकारी नसून, तोतया व्यक्ती असल्याचे समोर आले.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता सेक्शन 204 अंतर्गत त्याच्यावर कारवाई करत अटक करण्यात आली आहे. सध्या विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. तोतयागिरी करणाऱ्या व्यक्तीना आणखी कुणाला फसविले आहे का ? याबाबत पोलिस तपास करत आहे.

follow us