US-Iran deal reached, yet ship transit through Hormuz risky why BIMCO issue alert : जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक संघटनांपैकी एक असलेल्या Baltic and International Maritime Council (BIMCO) ने महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. हा इशारा विशेषतः Strait of Hormuz मधून प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी आहे. संघटनेने म्हटले आहे की, काल रात्री झालेल्या करारानंतरही होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक अद्याप धोकादायकच आहे.
BIMCO च्या मते, अमेरिका आणि इराणकडून करण्यात आलेली विधाने अद्याप पुरेशी स्पष्ट नाहीत. सुरक्षित मार्ग, वेळापत्रक आणि सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. माहितीचा अभाव आणि यापूर्वी दिलेल्या अतिआशावादी आश्वासनांचा अनुभव लक्षात घेता, जागतिक जहाज वाहतूक उद्योगासाठी सुरक्षेची परिस्थिती अजूनही अस्थिर असल्याचे संघटनेचे मत आहे.
करारानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण
प्रस्तावित कराराच्या मसुद्यानुसार, इराणच्या तेल निर्यातीवरील निर्बंधांना तात्पुरती सवलत देण्यात येणार आहे. तसेच अमेरिका सुमारे 25 अब्ज डॉलर्सची गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करण्यासही सहमती दर्शवू शकते.याशिवाय, होर्मुझ सामुद्रधुनीतून एलएनजी (LNG) वाहतूक पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने युरोप आणि आशियामध्ये मार्चपासून वाढलेल्या गॅसच्या किमती आणि पुरवठ्याच्या तुटवड्यापासून मोठा दिलासा मिळू शकतो. या घडामोडींचा परिणाम जागतिक तेल बाजारावरही दिसून आला. कराराच्या बातमीनंतर ब्रेंट क्रूडच्या किंमतीत सुरुवातीच्या व्यवहारात 4 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून कराराची घोषणा
अमेरिका आणि इराण यांच्यात करार झाल्याची घोषणा Shehbaz Sharif यांनी केली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भातील निवेदन शेअर केले. त्यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराची माहिती सार्वजनिक केली. दरम्यान, इराणचे उपपरराष्ट्र मंत्र्यांनीदेखील या कराराला दुजोरा दिला आहे. गेल्या 107 दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात लष्करी तणाव, वाटाघाटी, युद्धविराम आणि विविध राजनैतिक प्रयत्न सुरू होते. या सर्व प्रयत्नांनंतर अखेर दोन्ही देशांमध्ये करार झाल्याचे सांगितले जात आहे.
