Strait of Hormuz पुन्हा तणाव, अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले

Strait of Hormuz  : अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केल्याने अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी भडकली आहे.

Strait Of Hormuz

Strait Of Hormuz

Strait of Hormuz  : अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केल्याने अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी भडकली आहे. माहितीनुसार, अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनीमध्ये तीन टँकर्सना टार्गेट केले. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) अधिकृत निवेदन जारी करून दुजोरा दिला आहे की, अमेरिकन सैन्याने इराणच्या लष्करी ठिकाणांवर जोरदार हल्ले केले आहेत.

सेंटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या एकूण 80  ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात निष्पाप नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि तेलवाहू टँकर्सना इराणने (Iran) टार्गेट केल्याच्या कृतीला हे प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.तसेच इराणने युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा दावा देखील अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

इराणच्या ठिकाणांवर हल्ले

अमेरिकेच्या (America) संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते, या हल्ल्यांमध्ये इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवरील पाळत ठेवण्याची यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजांना नष्ट करणारी क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन प्रक्षेपण केंद्रे यांना टार्गेट करण्यात आले. दक्षिण इराणमधील सिरिक, केशम आणि बंदर अब्बास यांसारख्या प्रमुख बंदरांच्या शहरांमध्ये मोठे स्फोट ऐकू आले.

राज्यात आजही अतिमुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

इराणचे निवेदन

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ वर पोस्ट केले की, ते आपल्या राष्ट्रीय हितांचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलतील तसेच अमेरिकेने कराराचे उल्लंघन केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Exit mobile version