अमेरिका-इराण शांतता चर्चेला मोठा धक्का; इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला, जणांचा मृत्यू

US-Iran peace talks Israel attacks Lebanon अमेरिका-इराणमध्ये झालेल्या ऐतिहासिक शांतता कराराला सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे.

US Iran Peace Talks Israel Attacks Lebanon

Major setback for US-Iran peace talks Israel attacks Lebanon, casualties reported : अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक शांतता कराराला सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली असून त्यात किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, अमेरिका-इराण यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये होणारी महत्त्वाची शांतता चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे.

लेबनॉनमधील घडामोडींमुळे तणाव वाढला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत फ्रान्समधील व्हर्साय पॅलेसमध्ये बुधवारी अमेरिका आणि इराण यांच्यात प्राथमिक शांतता करार झाल्याचे सांगितले गेले होते. पश्चिम आशियातील संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या करारात लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया थांबवण्याचा उल्लेख होता.

UPI ने जग जिंकलं, पण बँकांची कागद-पेनची सवय सुटेना; SBI ने खर्च केले तब्बल 986 कोटी

मात्र, त्यानंतर लगेचच इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केल्याची माहिती समोर आली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हिजबुल्लाहचा धोका कायम असल्याचे सांगत कारवाया सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

स्वित्झर्लंडमधील चर्चा का पुढे ढकलली?

या प्राथमिक कराराला कायमस्वरूपी स्वरूप देण्यासाठी शुक्रवारी स्वित्झर्लंडमधील बुर्गेनस्टॉक रिसॉर्ट येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये तांत्रिक स्तरावरील चर्चा होणार होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे. या चर्चेचे नेतृत्व करणारे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्वित्झर्लंड दौरा पुढे ढकलल्याने ही बैठकही लांबणीवर पडली.

व्हाइट हाऊसचे स्पष्टीकरण

व्हाइट हाऊसने यामागे व्यवस्थापनाशी संबंधित कारणे असल्याचे म्हटले आहे. मात्र काही वृत्तांनुसार, लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांविरोधात इराणने आपले प्रतिनिधीमंडळ स्वित्झर्लंडला पाठवण्यास नकार दिल्याची चर्चा आहे.

इस्रायलला अमेरिकेचा इशारा?

शांतता करारानंतर उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी इस्रायलला संयम बाळगण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे इस्रायलच्या लष्करी भूमिकेबाबत अमेरिकेतही चिंता वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

शांतता करारावर अनिश्चिततेचे सावट

बुधवारी झालेल्या करारानुसार किमान 60 दिवसांसाठी युद्धविराम वाढवण्याबाबत सहमती झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, लेबनॉनमधील ताज्या हल्ल्यांमुळे आणि पुढील चर्चाच स्थगित झाल्याने या शांतता प्रक्रियेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संघर्ष न थांबल्यास पश्चिम आशियात स्थैर्य प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us