Texas Shooting : अमेरिकेत (America) गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच टेक्सासमध्ये (Texas Shooting)आणखी एक गोळीबारीची घडना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेक्सासमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार झाला आहे, त्यामध्ये लहान मुलांसह अनेक लोक जखमी झाले आहेत. संशयिताने टेक्सासमधील अॅलन प्रीमियम आउटलेट्स मॉलमध्ये गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित गोळीबाराला गोळ्या घालून ठार केले आहे.
गाजावाज करत प्रदर्शित झालेले मराठी सिनेमे का आपटले? जाणून घ्या सविस्तर
गोळीबाराच्या घटनेत काही लोक जखमी झाल्याची शक्यता कॉलिन काउंटी शेरीफ कार्यालयाने व्यक्त केली आहे. ऍलन पोलीस विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन लोकांना या परिसरात जाण्याचे टाळण्याचा सल्ला दिला आहे. शेरीफच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मॉलमध्ये काही पीडित आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबद्दल सध्या माहीत नाही.
अमेरिकेतील खासदार कीथ सेल्फ म्हणाले की, पोलिसांनी या जागेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. ते म्हणाले की, एका शूटरवर गोळीबार करण्यात आला आहे. आणि अनेक जखमी झाले आहेत. एका ट्विटमध्ये, कीथ सेल्फ म्हणाले की, आज अॅलन प्रीमियम आउटलेट्समधील शूटिंगच्या दुःखद बातमीने आम्ही दु:खी आहोत. आमच्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.
ते म्हणाले की ही परिस्थिती गंभीर आहेत, परंतु घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आहे. शूटरसह इतर अनेक जण जखमी झाले आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी सतत कार्यरत असतात. परिसरातील नागरिकांना घरातच राहण्यास सांगितले आहे.