गाजावाजा करत प्रदर्शित झालेले मराठी सिनेमे का आपटले? जाणून घ्या सविस्तर

गाजावाजा करत प्रदर्शित झालेले मराठी सिनेमे का आपटले? जाणून घ्या सविस्तर

Marathi Movies 2023 :   मराठीत विविध विषय, जॉनरचे दर्जेदार चित्रपट येत असतात. असं असलं तरी 2023 या वर्षात मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा तुटवडा जाणवतोय. 2022 मध्ये मराठीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट पाहायला मिळाली. मात्र 2023 या वर्षात प्रेक्षकांची मराठी चित्रपटांबाबत उदासिनता पाहायला मिळतेय. सध्या ओटीटीवरील फिल्म्स आणि वेबसिरीजचं प्रमाण वाढताना दिसतय. घरबसल्या प्रेक्षकांचं मनोरंजन होत असल्याने चित्रपटगृहात जाणं कमी झालय का असाही प्रश्न समोर येतोय.

2022 च्या शेवटाला वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षिक केलं आणि यावर्षातही या चित्रपटाने प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये गर्दी करायला भाग पाडलं. वेड या चित्रपटाने 75 कोटींचा गल्ला गाठला. वाळवी सारख्या चित्रपटालाही चांगली लोकप्रियता मिळाली. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि उत्कंठावर्धक कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि लक्षवेधी ठरला. 7.25 कोटींची कमाई या चित्रपटाने केली.

तर नुकताच प्रदर्शित झालेला महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट बऱ्यापैकी प्रेक्षकांना आकर्षिक करतोय. तर रौंदळ, जग्गू आणि जुलिएट या चित्रपटांनीही कोटींच्या घरात कमाई केली. रौंदळने 5 कोटींचा गल्ला गाठला तर जग्गू आणि जुलएट 2.5 कोटी इतकी कमाई करू शकले. मात्र आत्तापर्यंत या वर्षांत प्रदर्शित झालेल्या इतर मराठी चित्रपटांचं काय ? ते चित्रपट दर्जेदार नव्हते का ? प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची ताकद त्या चित्रपटांमध्ये नव्हती का ? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.

त्यानंतर आलेले सुर्या, साथ सोबत, व्हिक्टोरिया, सरला एक कोटी, बांबू, पिकोलो, गडद अंधार, आलय माझ्या राशीला, ढीश्क्याऊ, टर्री, घोडा, रगील, आय प्रेम यू, सातारचा सलमान, फुलराणी, घर बंदूक बिरयानी, सर्किट, सर्जा, स्कूल कॉलेज आणि लाईफ, उर्मी या आणि इतर चित्रपटांना तितकी चांगली कमाई करता आलेली नाही. यापैकी चांगली हवा झालेल्या घर बंदूक बिरयानी सारख्या चित्रपटानेही 5 कोटींचा गल्ला गाठला. टीडीएम, बलोच, सरी या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही स्क्रिन्स कमी मिळाल्याने आणि प्रेक्षकवर्ग कमी असल्याचे दिसून येतय.

https://letsupp.com/entertainment/the-kerala-story-cinematographer-prasantanu-mohapatra-talking-about-film-scenes-shoot-43306.html

या सर्व विषयावर चित्रपटांचे समीक्षक दिलीप ठाकूर लेट्सअप मराठीशी खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी मराठी सिनेमांच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. उत्तम असला तरी तो बॉक्स ऑफिसवर चालतोच असे नाही. एकीकडे आयपीएल पाहण्याकडे असलेला प्रेक्षकांचा ओढा व  दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील चढाओढ या गोष्टी मराठी सिनेमाला मारक ठरत आहेत. मराठी सिनेमची अशी स्थिती असताना दाक्षिणात्य सिनेमा मात्र मोठ्या प्रमाणावर यश मिळवताना दिसत आहे. तर टीडीएम सारख्या मराठी सिनेमाल थिएटरदेखील मिळत नाही आहे.

तेव्हा मराठी चित्रपटांसाठी सिनेमागृहांमध्ये हाऊसफुलचे बोर्ड आणि बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला हे चित्र पाहण्यासाठी पुन्हा एकदा एखाद्या सैराट सारख्या चित्रपटाची गरज आहे का ? असाही प्रश्न समोर येतोय. असं असलं तरी मराठी चित्रपटाच्या यशासाठी प्रेक्षकांनी दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये गर्दी करणं गरजेचं ही सध्याची स्थिती आहे, असे ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube