Download App

US Soldier Arrested: कुख्यात दहशतवादी लादेनचा खात्मा करणाऱ्या माजी कमांडरला अटक

US Soldier Arrested: पाकिस्तानच्या (Pakistan) अबोटाबाद शहरात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनचा (Osama Bin Laden) खात्मा करणार्‍या अमेरिकन (America) नेव्ही सीलचा माजी कमांडर रॉबर्ट जे ओ’नील (Commander Robert J. O’Neill) याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. माजी कमांडर नीलला टेक्सास सिटीमध्ये दारुच्या नशेत अभद्र वर्तन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, नीलला अटक झाल्यानंतर काही तासांतच जामीन मिळाला.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, 47 वर्षीय रॉबर्ट जे. ओ’नीलवर फ्रिस्कोमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला बुधवारी अटक करण्यात आली. मात्र, नीलला अटक केल्यानंतर काही तासांतच 2 लाख 88 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले. त्याला लाउंजमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नील हा पॉडकास्ट रेकॉर्ड करत असताना हा गोंधळ झाला.

World Athletics Championships : भारताच्या पुरुष संघाची 4×400 मीटरच्या अंतिम फेरीत धडक

याआधीही वादात सापडला
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, माजी कमांडर नील याआधीही वादात सापडला आहे. त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये, अमेरिका महामारीच्या विळख्यात असतानाही त्यांनी मास्क घालण्यास नकार दिला होता. यापूर्वी, नीलने 2013 मध्ये एस्क्वायर मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याने मे 2011 मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ऑपरेशन नेपच्यून स्पीयर दरम्यान बिन लादेनचा खात्मा केला होता.

खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला 10 वर्षीय मुलाचा मृतदेह

लादेनला ठार मारण्याच्या कारवाईत सहभाग
विशेष म्हणजे, ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी ज्या मोहिमेने ऑपरेशन केले त्यात नील स्वत: सामील असल्याचा दावा करतो. मात्र आजपर्यंत याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत. यूएस सरकारने कधीही नीलच्या दाव्यांचे समर्थन केले नाही आणि सरकारने नीलचे दावे कधीही नाकारले नाहीत.

Tags

follow us