USA News : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच भारताच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहेत. आताच मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकी सुप्रीम कोर्टाने शनिवारी सन 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे. तहव्वूर राणाला ताब्यात देण्यासाठी भारताकडून मागील काही वर्षांपासून सातत्याने मागणी केली जात होती. तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी आणि सध्या कॅनडाचा नागरिक आहे. तहव्वूर राणा 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वाँटेड आहे. कनिष्ठ न्यायालयांनी झटका दिल्यानंतर राणाने अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
डेविड हेडली याची मदत केल्याचा गंभीर आरोप राणावर आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेविड हेडलीला मुंबईतील ठिकाणांची रेकी करण्यास राणाने मदत केली होती. भारताने अमेरिकेतील न्यायालयात 26/11 हल्ल्याच्या ठिकाणांच्या रेकीचे पुरावे सादर केले होते. तहव्वूर राणाला सन 2009 मध्येच शिकागोतून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआय आणि लष्कर ए तैयबा या संघटनाशी राणा जोडलेला असल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. तसेच आयएसआय आणि लष्कर ए तैयबा संघटनांचा ऑपरेटर असल्याचेही सांगण्यात आले होते.
अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय! मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला कोर्टाचा दणका
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेविड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाने मदत केली होती असा आरोप त्याच्यावर आहे. हेडलीच्याच इशाऱ्यावर या पूर्ण षडयंत्राला अंमलात आणले जात होते. राणा हेडलीचा उजवा हात होता. कंट्रोल रुममध्ये जो व्यक्ती बसून होता तो तहव्वूर राणाच होता असे सांगितले गेले होते. आता राणा भारतात आल्यानंतर या हल्ल्याचा पर्दाफाश तपास यंत्रणा करतील. या हल्ल्यात आणखी कुणाचा भूमिका होती याचंही उत्तर मिळणार आहे. या हल्ल्यात आणखी किती लोक सहभागी होते त्यांचीही नावे समोर येतील.
26 नोव्हेंबर 2008 या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यांत एकूण सहा अमेरिकींसहीत 166 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 60 तासांपेक्षा अधिक काळ मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले होते. या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता.
एनआयएने दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात हेडली, राणा, हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी, इलियास काश्मिरी, साजिद मीर, अब्दुर रहमान हाशिम सय्यद, मेजर इक्बाल आणि मेजर समीर अली यांची नावे आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी लष्कर-ए-तैयबा आणि हुजीच्यावतीने महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करून योजना आखली. यात मुंबईत झालेल्या 26/11 च्या ठिकाणांचाही समावेश आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी
शिकागोत रचला मुंबई हल्ल्याचा कट
पाकिस्तानात जन्म, नंतर कॅनडात स्थायिक
डेविड कोलमन हेडलीचा उजवा हात म्हणून ओळख
मुंबईत शाखा उघडून हल्ल्याचं षडयंत्र रचलं.