Venezueala Earthquake : व्हेनेझुएला दोन भूकंपांनी हादरलं! 10 हजार जणांचा मृत्यू? कॅरिबियन बेटांसाठी त्सुनामीचा इशारा

व्हेनेझुएला दोन भूकंपांनी हादरलं असून भूकंपामुळे आत्तापर्यंत 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Venezueala Earthquake

Venezueala Earthquake

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलामध्ये दोन भूकंपाचे मोठे धक्का (Venezuela Earthquake) बसल्याची माहिती समोर येत आहे. एक 7.2 तर दुसरा 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून हा भूकंपामध्ये जवळपास 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून रायटर वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपामुळे व्हेनेझुएलामध्ये आपत्तकालीन परिस्थिती घोषित करण्यात आली असून बचावकार्य सुरु आहे.

या भूकंपामुळे आत्तापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला? याबाबत अधिकृत आकडा समोर आलेला नसून 10 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू नागरी वस्तीतच असल्याचीही माहिती सांगण्यात येत असून राजधानी कॅराकसमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर कॅरिबियन बेटांसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डियोस्डाडो काबेयो यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराकस शहरातील अल्तामिरा भागात सर्वाधिक नुकसान झाले असून तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. या परिसरातील अनेक इमारती आणि घरं पडली आहेत. भूकंपाचे आणखी हादरे बसू शकतात, या शक्यतेने सरकारने लोकांना पुन्हा घरात जाऊ नये, अशी सूचना दिली होती. या दुर्घटनेत हजारो नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.

नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला. भूकंपाचे केंद्र कराकासच्या पश्चिमेला मोंटालबान क्षेत्रात होते. हा झटका इतका तीव्र होता की कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे हादरे जाणवले. या झटक्यांची तीव्रता त्रूजिलो, याराकुई, काराबोबो, अरागुआ, मिरांडा, कराकास आणि ला गुआइरा या ठिकाणी जाणवली.

Exit mobile version