जपानचा रशियाला दणका! निर्यातबंदीसह अनेकांची संपत्ती होणार जप्त; नेमकं कारण काय?

जपानचा रशियाला दणका! निर्यातबंदीसह अनेकांची संपत्ती होणार जप्त; नेमकं कारण काय?

Japan News : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) अजूनही सुरूच आहे. या दरम्यानच आता रशियाला धक्का देणारी बातमी आली आहे. जपानने (Japan News) रशिया विरुद्ध मोठा निर्णय घेतला आहे. जपानने रशियावर अनेक निर्बंध नव्याने लादले आहेत. जपान सरकारने शुक्रवारी या निर्णयाला मंजुरी दिली. यनुसार काही व्यक्ती आणि समुहांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच काही वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येणार आहे. येत्या 23 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी सांगितले की रशियावर अतिरिक्त निर्बंध (Ukraine War) लादण्यास शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली. जपानने पहिल्यांदाच रशियावर निर्बंध टाकले आहेत असे नाही. याआधीही काही निर्बंध टाकले आहेत. देशाचे धोरण काय असेल याची माहिती पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी सप्टेंबर महिन्यात झालेल्या जी 7 राष्ट्रांच्या बैठकीत दिली होती. त्यानंतर जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! युक्रेनचा न्यूक्लिअर प्लांट असलेल्या शहरावर मिसाइल हल्ला; 13 लोकांचा मृत्यू

जपानचे नवीन निर्बंध कोणते

जपान सरकारच्या परराष्ट्र, वित्त आणि व्यापार मंत्रालयानी एक संयुक्त निवेदनात रशियावर कोणते निर्बंध लादण्यात आले आहेत याची माहिती दिली. 11 व्यक्ती आणि 29 संघटना आणि रशियाच्या तीन बँकांसह एक उत्तर कोरिया आणि एक जोर्जियाची बँकेला फ्रिज लिस्टमध्ये जोडण्यात आले आहे. म्हणजेच या व्यक्ती आणि संस्थांची संपत्ती आता जप्त करण्यात येणार आहे.

जपान सरकारच्या कॅबिनेटने टेक्नॉलॉजी आणि मशिनरी मेकरसह रशियन सैन्याशी संबंधित 22 संघटनांवर निर्यात बंदीला मंजुरी दिली आहे. याबरोबरच 335 वस्तूंची यादी तयार करण्यात आली आहे. या वस्तू रशियात निर्यात करता येणार नाहीत. व्यापार आणि उद्योग मंत्रालयानुसार वाहन इंजिन आणि त्याचे विविध पार्ट्स, दूरसंचार उपकरणे, मेकॅनिकल आणि व्हॉल्व यांसारख्या महत्वाच्या वस्तू्ंचा यात समावेश आहे.

या व्यतिरिक्त जपानने 31 गैर रशियन समुहांवरही निर्यात निर्बंध टाकले आहेत. या 31 समुहांनी आधी निर्बंध असतानाही त्यांचे उल्लंघन करत विविध प्रकारे रशियाकडून मदत घेतली असे जपान सरकारचे म्हणणे आहे. या यादीत हाँगकाँगच्या 11, चीनमधील 7, तूर्कीचे 8, किर्गिस्तानचे 2, आणि प्रत्येकी 1 समूह थायलंड, युएई आणि कजाकिस्तानमधील आहे.

मोठी बातमी! जपान एअरलाइन्सवर सायबर हल्ला, विमानसेवा विस्कळीत; प्रवासी ताटकळले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube