मोठी बातमी! युक्रेनचा न्यूक्लिअर प्लांट असलेल्या शहरावर मिसाइल हल्ला; 13 लोकांचा मृत्यू

मोठी बातमी! युक्रेनचा न्यूक्लिअर प्लांट असलेल्या शहरावर मिसाइल हल्ला; 13 लोकांचा मृत्यू

Zaporizhzhia Attack : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही (Russia Ukraine Attack) सुरुच आहे. आता या युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनच्या जापोरिज्जिया शहरावर मोठा मिसाइल हल्ला केला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात कमीत कमी 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्या टेलिग्रॅम चॅनलवर एक फुटेज पोस्ट करण्यात आले आहे. लोक रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे यात दिसत आहे. रशियाने हल्ला केलेल्या जापोरिज्जिया याच शहरात युक्रेनचा न्युक्लिअर प्लँट आहे.

मोठी घडामोड! ब्रिक्समध्ये इंडोनेशियाची एन्ट्री, पाकिस्तान अस्वस्थ; चीनचाही प्लॅन फेल

या फुटेजमध्ये हल्ल्यातील जखमी लोकांना मदत करताना आपत्कालीन सेवेतील कर्मचारी दिसत आहेत. जखमींना स्ट्रेचरवर नेले जात आहे. जवळपास तीन वर्षांच्या युद्धात रशियाने अनेक वेळा युक्रेनच्या रहिवासी भागात हल्ले केले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर हा युरोपातील सर्वात मोठा संघर्ष आहे. यामध्ये हजारो नागरिक मारले गेले आहेत.

झेलेन्स्की आणि स्थानिक गव्हर्नर इवान फेडोरोव यांनी सांगितले की या हल्ल्यात कमीत कमी 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्याच्या काही मिनिट आधीच फेडोरोव यांनी जापोरिज्जियात मिसाइल आणि ग्लाइड बॉम्ब हल्ल्याचा इशारा दिला होता. रशियाच्या सैन्याने दुपारच्या वेळी जापोरिज्जियामध्ये ग्लाइड बॉम्ब टाकण्यास सुरुवात केली होती. दोन बॉम्ब इमारतींवर पडले. आज या भागात शोक दिवस पाळण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

एका शहरावर बॉम्ब हल्ला करणे यापेक्षा क्रूर आणखी काही असू शकत नाही. जे देश युद्धाचा शेवट करू इच्छितात त्यांनी युक्रेनच्या भविष्याच्या सुरक्षिततेची हमी द्यायला हवी. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी अशी भीती वाटते की जर युद्धाविराम किंवा एखादा शांतता करार रशियाला पुन्हा आक्रमण करण्यासाठी वेळ देऊ शकेल. त्यामुळे युद्ध अजूनही संपलेले नाही. आता रशियाने पुन्हा एकदा नागरिकांना लक्ष्य करत युक्रेनची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिका, युरोप, नाटो अन् एक टीव्ही शो.. युक्रेन-रशिया युद्धाचं नेमकं कारण तरी काय?

2014 नंतर संबंध बिघडण्यास सुरुवात

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संबंध 2014 पर्यंत चांगले होते. पण ज्यावेळी युरोपियन युनियनने फ्री ट्रेड अॅग्रीमेंटवर सही करण्याची विचारणा युक्रेनला केली तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी युरोपियन इकॉनॉमिक युनियन जॉईन देखील केली. या निर्णयाने युरोपियन युनियन युक्रेनवर नाराज झाला. नंतर मात्र युक्रेनला आपल्याकडे वळवण्यात युरोपियन युनियनला यश मिळालं.

युक्रेनच्या पश्चिम भागात सरकार विरुद्ध अनेक आंदोलने झाली. या आंदोलनांमागे अमेरिका आणि युरोप असल्याचे सांगितले गेले. या आंदोलनांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना रशियाला शरण जावं लागलं. यानंतर पेट्रो पोरोशेंको राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी लगेच अमेरिका आणि युरोप धार्जिणे निर्णय घेण्यास सुरुवात केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube