वॉशिंग्टनला जा अन् ट्रम्पचा गेम कर..व्हाईट हाऊसबाहेर आरोपीचा चक्रावणारा दावा…

Donald Trump : डोक्यात सतत एकच आवाज घुमत होता... 'वॉशिंग्टनला जा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा गेम फिनिश कर'

Donal Trump

Donal Trump

Venezuelan Man Arrested Near White House : डोक्यात सतत एकच आवाज घुमत होता… ‘वॉशिंग्टनला जा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा गेम फिनिश कर’ या एका अदृश्य आवाजाच्या तालावर धावत  सुटला, हातात अत्याधुनिक शस्त्रे घेतली आणि थेट पोहोचला व्हाईट हाऊसच्या अगदी जवळ…अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा एक खळबळजनक आणि विचित्र कट उघडकीस आला आहे. अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने एका वेनेजुएलाच्या नागरिकाला बेड्या ठोकल्या. त्याच्या कारमधून 3 घातक बंदूका आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मात्र, पोलिसांच्या चौकशीत आरोपीने दिलेले कारण ऐकून तपास यंत्रणाही अवाक झाल्या आहेत. “माझ्या डोक्यात विचित्र आवाज येत होते आणि तेच मला ट्रम्प यांना मारण्याची आज्ञा देत होते,” असा दावा त्याने केला आहे. पण आरोपीचा हा जबाब न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीच्या प्रतिज्ञापत्रात नोंदवलेली नाही.

प्रकाशित वृत्तांनुसार अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) आणि सीक्रेट सर्व्हिसने गुरुवारी रात्री ही मोठी कारवाई केली. आरोपीची ओळख रोनी यॉर्ड्रिक्स गुआनिपा क्रिनोस अशी झाली असून तो वेनेजुएलाचा रहिवासी आहे. चौकशीदरम्यान आरोपीने दिलेल्या जबाबाने अधिकारीही चक्रावून गेले आहे. “माझ्या डोक्यात काही विचित्र आवाज येत होते आणि ते आवाज मला वॉशिंग्टनला जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचे सांगत होते,” असा दावा आरोपीने केला आहे.

सीक्रेट सर्व्हिसने आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कारची झडती घेतली असता त्याच्याजवळील कार चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नव्हे तर, कारमधून 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. DHS च्या माहितीनुसार, आरोपी मार्च 2024 मध्ये टेक्सासच्या सीमेवरून अमेरिकेत बेकायदेशीरपणे दाखल झाला होता. सध्या तो अमेरिकन मार्शल सर्व्हिसच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक धमक्या मिळाल्या आहेत. सीक्रेट सर्व्हिसने यापूर्वीही अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version