अमेरिकेत ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ संपणार? डोनाल्ड ट्रम्पने न्यायालयात दाखल केली याचिका

US Birthright Citizenship :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच त्यांनी

US Birthright Citizenship

US Birthright Citizenship :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारवाई केली होती तर आता पुन्हा एकदा त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जन्मसिद्ध अमेरिकन नागरिकत्व रद्द (US Birthright Citizenship) करण्याची तयारी करत आहे. यासाठी ट्रम्प सरकारने  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

भविष्यात स्थलांतरितांच्या मुलांना नागरिकत्व देण्यात येऊ नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अमेरिकेचे नागरिकत्व नियमानुसार सध्या  अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आपोआप तिथले नागरिकत्व मिळते.

न्यायालयात याचिका दाखल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने गुरुवारी न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व संपवण्याच्या त्यांच्या योजनेला पुढे जाण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे. यापूर्वी या याचिकेवर सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालयाने ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि कायदेशीर लढाई सुरू असताना जन्मसिद्ध नागरिकत्वावरील निर्बंध अंशतः लागू राहावेत अशी विनंती केली.

इंडिया मास्टर्सचा शानदार विजय, सचिन – युवराज चमकले, ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये 94 धावांनी पराभव

देशात जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व मिळते

अमेरिकेत जन्मलेल्या मुलांचा तिथले नागरिकत्व मिळणे हा त्यांचा अधिकार मानला जातो. 14 व्या घटनादुरुस्तीमुळे अमेरिकेत जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला, त्याचे पालक स्थलांतरित असले तरीही, नागरिकत्वाची हमी मिळते असे समजले जाते. या प्रकरणात, न्यायालयाने असा युक्तिवाद केला की हा दीर्घकाळ चाललेला दृष्टिकोन चुकीचा आहे, कारण 14 व्या घटनादुरुस्तीमध्ये एक ओळ समाविष्ट होती ज्यामध्ये म्हटले होते की हा लाभ फक्त त्यांनाच मिळेल जे युनायटेड स्टेट्सच्या ‘अधिकारक्षेत्राच्या अधीन’ आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube