इंडिया मास्टर्सचा शानदार विजय, सचिन – युवराज चमकले, ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये 94 धावांनी पराभव

इंडिया मास्टर्सचा शानदार विजय, सचिन – युवराज चमकले, ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये 94 धावांनी पराभव

IML 2025 : रायपुर येथे झालेल्या इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी-20 च्या (IML 2025) पहिल्या सेमीफायनलमध्ये इंडिया मास्टर्सने (India Masters) शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा (Australia Masters) 94 धावांनी पराभव केला आहे. तर या स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलंका मास्टर्स (Sri Lanka Masters) आणि वेस्ट इंडिज मास्टर्स (West Indies Masters) आमनेसामने असणार आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया मास्टर्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंडिया मास्टर्सने 7 विकेट्स गमावून 220  धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया मास्टर्स 18.1 षटकांत फक्त 126 धावा करू शकला. इंडिया मास्टर्सकडून कर्णधार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि युवराज सिंगने (Yuvraj Singh) शानदार खेळी करत इंडिया मास्टर्सचा या सामन्यात विजय निश्चित केला.

सचिन आणि युवराज चमकले

प्रथम फलंदाजी करताना इंडिया मास्टर्सची सुरुवात खुपच खराब झाली. सलामीवीर अंबाती रायुडू फक्त 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर पवन नेगी देखील फार काही करू शकला नाही. मात्र त्यानंतर युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी जबरदस्त फलंदाजी करत भारताला 220 धावांपर्यंत पोहचण्यास मदत केली. इंडिया मास्टर्सकडून युवराज सिंगने 30 चेंडूत 59 धावा केल्या तर . सचिनने 42 धावा आणि त्यानंतर फलंदाजी आलेल्या स्टुअर्ट बिन्नीने 21 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 36 धावा केल्या. तर युसूफ पठाणनेही 10 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या.

इरफान पठाणने 7 चेंडूत 19 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया मास्टर्सकडून बेन हेल्फेनहॉसने 1, स्टीव्ह ओ’कीफने 1, नॅथन कुल्टर नाईलने 1, झेवियर डोहर्टीने 2 आणि डॅनियल ख्रिश्चनने 2 विकेट घेतल्या.

CM फडणवीस दिल्लीत! PM मोदींची घेतली भेट, नेमकं कारण काय?

ऑस्ट्रेलिया मास्टर्स 126 ऑल आऊट

220 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची देखील सुरुवात खुपच खराब झाली. शॉन मार्शने 21 धावा, बेन डंकने 21, नॅथन रीअर्डनने 21 आणि बेन कटिंगने 39 धावा केल्या. याशिवाय इतर कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही आणि संपूर्ण संघ 18.1 षटकात 126 धावांवर ऑलआउट झाला. भारताकडून शाहबाज नदीमने 4 षटकांत 15 धावा देत 4 विकेट्स घेतले तर इरफान पठाणने 2 आणि स्टुअर्ट बिन्नी, पवन नेगीने 1-1 विकेट आपल्या नावावर केल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube