डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवाला धोका? व्हाईट हाऊसजवळ बंदुकधारी संशयित, गुप्तचर यंत्रणेने झाडल्या गोळा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवाला धोका? व्हाईट हाऊसजवळ बंदुकधारी संशयित, गुप्तचर यंत्रणेने झाडल्या गोळा

Man Shot By Secret Service Near Donald Trump White House : अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर (America News) आलीय. तेथे व्हाईट हाऊसजवळ एका संशयिताला अमेरिकन गुप्तहेर सेवेने गोळ्या घातल्या. ही घटना आज रविवार 9 मार्च रोजी घडल्याचं सांगितलं जातंय. या घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये (Donald Trump) उपस्थित नव्हते. गोळीबार झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामध्ये होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर व्हाईट हाऊसजवळ अमेरिकेच्या गुप्तचर सेवा एजंट्सनी इंडियानाहून प्रवास करत असलेल्या एका सशस्त्र व्यक्तीला गोळ्या घालून ठार (Donald Trump White House) मारले. व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, असं गुप्तचर सेवेच्या निवेदनात म्हटलंय. गोळीबाराच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामध्ये होते.

‘माझ्या वडिलांना न्याय द्या…’ वैभवी ढसाढसा रडली, थेट बारामतीकरांच्या काळजाला हात घातला

इंडियानाहून प्रवास करणाऱ्या एका आत्महत्याग्रस्त व्यक्तीबद्दल स्थानिक पोलिसांकडून गुप्तचर सेवेला माहिती मिळाली होती. एजंटना त्या माणसाची कार आणि त्याच्या वर्णनाशी जुळणारा एक माणूस जवळपास सापडला. अधिकारी जवळ येताच, त्या व्यक्तीने बंदुक दाखवली. त्यांच्यात सशस्त्र चकमक सुरू झाली, त्यादरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांनी गोळीबार केला, असं गुप्तचर सेवेने एका निवेदनात म्हटलंय. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

गुप्तचर सेवेने सांगितलंय की, त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती अज्ञात आहे. या घटनेत गुप्तचर सेवेचा कोणताही कर्मचारी जखमी झाला नाही, असं निवेदनात म्हटलंय. या प्रकरणाची चौकशी मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाकडून केली जाईल, कारण ते डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये बळाच्या वापराच्या घटनांसाठी प्राथमिक एजन्सी आहेत.

‘माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप…’ धनंजय मुंडे भडकले, इशारा नेमका कोणाला?

गेल्या वर्षी अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या रॅलींमध्ये तीन हल्ले झाले होते. 13 जुलै 2024 रोजी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यानंतर अनेक कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. व्हाईट हाऊसजवळील ताज्या घटनेने सुरक्षा यंत्रणांना पुन्हा एकदा सतर्क केले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube