‘माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप…’ धनंजय मुंडे भडकले, इशारा नेमका कोणाला?

Dhananjay Munde Reply To Suresh Dhas Criticism : महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) नुकतंच मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. यानंतर मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. मुंडे यांच्यावर सर्व प्रकारचे आरोप केले जात (Beed Politics) आहेत. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताना त्यांच्या आईसंदर्भात वक्तव्य केलं होतं. याला आता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय.
धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या खूपच आहारी गेलेत. त्यामुळे मुंडेंचं कुटुंब देखील त्यांच्यावर नाराज आहे. मुंडेंची आई मागील दीड वर्षापासून त्यांच्या नाथरा गावी गेल्यात, त्या अजून आल्याचं नाहीत, असं वक्तव्य आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलं होतं. यावर आता धनंजय मुंडे प्रचंड संतापल्याचं दिसत आहे.
परळीचे आमदार सुरेश धस यांनी X अकाउंटवर पोस्ट करत म्हटलंय की, परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे आहे. त्यामुळे मी, माझी आई आणि कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो (Dhananjay Mundes Mother) आहोत. तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच याआधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो, असं सांगितले होतं. काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते, असं सांगितले. खोटे नाटे आरोप केले.
एआयमुळे विद्यार्थी बनत आहेत ‘चिटर’; 77 टक्के मुलांकडून वापर, धक्कादायक अहवाल…
माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे. मात्र, त्याबाबतीतही चुकीचे आरोप केले आहेत. गेमागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र, आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत, म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे.
परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 9, 2025
राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळं मी सहन केलं. मात्र, माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल, तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे. राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत आहे, असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘ संतोष देशमुख हत्या… त्यामागे धनंजय मुंडेच’, अंजली दमानिया यांनी नवीन बॉम्ब फोडला