‘रस्त्यांखाली… हजार वर्षांपूर्वीचं काहीतरी सापडेल’, शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप

‘रस्त्यांखाली… हजार वर्षांपूर्वीचं काहीतरी सापडेल’, शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप

Aditya Thackeray Allegations against Eknath Shinde : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केलाय. मिमिक्री करत त्यांनी एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) बीएमसीवरून गंभीर आरोप देखील केले आहेत. कालिदास नाट्यगृहात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आयोजित केले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांवर एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला (Mumbai BMC Streets) आहे.

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळ्यांची तक्रार एकच आहे. रस्ते खोदून ठेवले. खोदून ठेवले. बीएमसी रस्त्यांखाली काही शोधताय का काय, असं आता मला वाटायला लागलंय. कदाचित त्यांना पुरातन काही तिथे (Maharashtra Politics) मिळेल. एकेकाळी पुरातन साम्राज्य होतं. त्यांना कदाचित हजार-दोन हजार वर्षांपूर्वीचं काहीतरी सापडेल. पण हे कशासाठी होतंय, कोणासाठी होतंय, का म्हणून होतंय? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.

‘ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार…’ भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट

दोन वर्षापूर्वी 15 जानेवारी 2023 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी मी सांगितलं होतं की, या मुंबईमध्ये रस्ते घोटाळा होत आहे. त्यावेळी मी पंतप्रधान महोदयांना विनंती केली होती की, आपण देशाचे पंतप्रधान (Mumbai News) आहात. बदनामी आम्हालाही चालणार नाही. आपल्या हातून चुकीच्या गोष्टीचं भूमिपूजन व्हायला नको. आपण या रस्त्याचं भूमिपूजन करू नका. तेव्हा सहा हजार ऐंशी कोटींचं टेंडर निघालं होतं. मी पत्रकार परिषद घेतली होती.

एकनाथ शिंदे यांचे पाच मित्र, जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना पाच पाकिटं देण्यात आली होती. मुंबईचे पाच भाग केले होते. शंभर कोटीहून जास्त अडवान्स मोबेलायझेशन देणार होते. मी मुख्यमंत्र्‍यांना चॅलेंज केलं होतं की, मी प्रुफ करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की, ‘ अरे खड्डे मुक्त करू, दोन वर्षात खड्डे मुक्त करू. अरे म्हणून…’ अशी मिमिक्री करत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय.

साहेब मला माफ करा; पुण्यातील रस्त्यावर लघूशंका करणाऱ्या गौरव आहुजाचे कोणते शिंदे साहेब?

आदित्य ठाकरे यावेळी सवाल उपस्थित करीत म्हणाले की, याला किती वर्षे उलटून गेलीत? स्वत:चं मुख्यमंत्रीपद गेलंय. पण मुंबई खड्डेमुक्त झालीय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मिंधेंनी औषध खातं स्ट्रीट फनिर्चरसाठी वापरलं, असं देखील ठाकरे म्हणालेत. निर्लज्जपणे कारभार चाललाय, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube