Dhananjay Munde यांचा लातूर-नांदेडकरांना दणका; प्रकल्पांच्या पळवापळवीनं नवा वाद पेटणार…

Dhananjay Munde यांचा लातूर-नांदेडकरांना दणका; प्रकल्पांच्या पळवापळवीनं नवा वाद पेटणार…

Dhananjay Munde : मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विकास होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक तब्बल सात वर्षानंतर झाली. या बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. एकट्या मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाख खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी जाहीर केले. असे असले तरी विरोधकांनी मात्र हे सर्व निर्णय जुनेच असल्याचा आरोप केला आहे. त्यातच एक नवा वाद होण्याची शक्यता आहे.

Rohit Pawar : 15 दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा.. रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम !

त्याचं कारण म्हणजे कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी बहुतांश निधी आपल्या परळी(Parali) मतदार संघासाठी कामी लावल्याचं पाहायला मिळतंय. नांदेड(Nanded) आणि लातूर(Latur) जिल्ह्याच्या तोंडाला मात्र पानं पुसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

Justin Trudeau : जस्टिन ट्रूडो अन् वाद विवाद; पंतप्रधान असतानाच घेतला होता घटस्फोट…

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवून लातूरकरांना मोठा दणकाच दिला आहे. त्यामुळे लातूरकरांमध्ये असंतोष पसरुन ते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

तसं पाहिलं गेलं तर सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र यापैकी एक केंद्र लातूर आणि एक नांदेड जिल्ह्यामध्ये होणे गरजेचे होते. तसं न होता, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपलं राजकीय वजन वापरुन हे दोन्हीही मोठ-मोठे प्रकल्प आपल्याच मतदारसंघामध्ये हलवले आणि लातूर-नांदेडकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या विविध भागात होऊ घातलेल्या विविध योजना थेट आपल्या परळी आणि अंबाजोगाईमध्ये खेचून नेल्या आहेत. तसं पाहिलं तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये विकासाची गंगा वाहिली पाहिजे. कृषीमंत्र्यांकडून बाकीच्या जिल्ह्यांवर कुरघोडी केली जात असल्याचा आरोप सुरु झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील देवणी येथील देवणी अन् नांदेड जिल्ह्याच्या कंधारची कंधारी हे त्या त्या भागाची ओळख आहे. राज्यातील प्रसिद्ध गोवंशांमध्ये या जातींचा समावेश होतो. गोवंश जातीवर संशोधन होणार असेल तर त्या भागातच त्याची उपज उत्पादन आणि विक्री होत असेल त्याच ठिकाणी होणे अपेक्षीत आहे. उलट आता लाल कंधारी, देवणी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला नेल्यामुळे लातुरकर आणि नांदेडकरांना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी चांगलाच दणका दिला आहे.

कृषीमंत्र्यांच्या मतदार संघासाठी झालेले निर्णय
– परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
– परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
– परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र
– लातूर जिल्ह्यातील देवणचे देवणी वंश संशोधन केंद्र
– सोयाबीन संशोधन केंद्र

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube