‘ संतोष देशमुख हत्या… त्यामागे धनंजय मुंडेच’, अंजली दमानिया यांनी नवीन बॉम्ब फोडला

Anjali Damania New Allegations On Dhanajay Munde : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन पुरावे समोर येत आहेत. त्यामुळं राज्यात वातावरण तापलेलंच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलंय. त्यांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले होते. त्यानंतर संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो व्हायरल झाले. यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर (Dhanajay Munde) आता पुन्हा नवीन आरोप केल्याचं समोर आलंय.
X अकाउंटवर पोस्ट शेअर करत अंजली दमानिया यांनी म्हटलंय (Beed News) की, गेले काही दिवस एक व्यक्ती मला काही माहिती देण्यासाठी बरेच फ़ोन करत होते. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून ( व्हॉट्सअप वर संपर्क ठेऊन) खालील माणसे काम करत होती.
1. शिवलिंग मोराळे – ज्यांनी स्कॉर्प्यूओ मधून कराड ला CID ऑफिस मधे आणले.
2. बालाजी तांदळे- ज्यांनी पोलिसांना घेऊन आरोपींचा शोध घेतला आणि
3. सारंग आंधळे – माहिती देणे
एआयमुळे विद्यार्थी बनत आहेत ‘चिटर’; 77 टक्के मुलांकडून वापर, धक्कादायक अहवाल…
म्हणून या लोकांना अटक होणार नाही, कारण तसं झाल्यास त्यांचे फोन जप्त होतील. मग त्यामागे मंत्री धनंजय मुंडे आहे, हे स्पष्ट होईल. ही मला मिळालेली माहिती, मी पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी याचे इन्वेस्टीगेशन करावे, अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी दिलीय. त्या म्हणाल्या की, मी या माहितीसंदर्भात धनंजय देशमुख यांच्या साडूभाऊंशी बोलले आहे. ते म्हणाले, बालाजी तांदळेनी स्वतः ही माहिती त्यांना सांगितली होती. आरोपींना शोधण्यासाठी आमच्या 200 गाड्या फिरत होत्या. त्यांना आम्ही पकडले, पोलिसांनी नाही.
‘ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार…’ भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट
हे कदाचित स्वतःला आणि वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी या लोकांचा बळी द्यावा, असं ठरवलं असेल. या विषयावर मी माध्यमांशी बोलणार नाही. त्यामुळे कोणीही घरी येऊ नये, किंवा फोन मागू नये. माझी प्रतिक्रिया मी उद्या म्हणजे, सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता मांडेन, असं देखील अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता उद्या सकाळी अंजली दमानिया कोणते पुरावे दाखवतात, काय गौप्यस्फोट करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वची माहिती
गेले काही दिवस एक व्यक्ती मला काही माहिती देण्यासाठी बरेच फ़ोन करत होते. त्यांच्याशी बोलणे झाले.
त्यांच्या सांगण्याप्रमाणे
मंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून ( व्हॉट्सअप वर संपर्क ठेऊन) खालील माणसे काम करत होती.
१. शिवलिंग मोराळे – ज्यांनी स्कॉर्प्यूओ… pic.twitter.com/8pcg0Izjre— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 9, 2025