संतोष देशमुखांचा भाऊ, मुलगी भगवानगडावर; नामदेव शास्त्रींचा गडाच्या गादीवरून देशमुख कुटुंबाला ‘न्याया’चा शब्द
Namdev Shastri’s word of ‘justice’ to the Santosh Deshmukh family : केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात काही आरोपींना अटक झालेली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनाही आरोपी करण्याची मागणी होत आहे. त्यातून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहे. त्यात तीन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर गेले होते. त्या ठिकाणी ते मुक्कामी थांबले होते. त्यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी अनेक सोसले आहे. ते गुन्हेगारी नाहीत. त्यामुळे गड मुंडेंच्या पाठीशी आहे, असा असा पाठिंबा नामदेव शास्त्री ((Namdev Shastri) यांनी दिला. त्यावरून नामदेव शास्त्री यांच्यावर टीका सुरू झाली होती. संतोष देशमुख कुटुंबानेही काही प्रश्न नामदेव शास्त्री यांना विचारले होते. त्यानंतर रविवारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, त्यांची मुलगी वैभवी देशमुख हे भगवान गडावर आले होते. त्यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.
वृद्धाने 28 लाख गमावले, पोलिसांनी 22 लाख मिळवून दिले; बुलढाण्यात धक्कादायक ‘डिजीटल अरेस्ट’ स्कॅम!
संतोष देशमुख यांची हत्या कशा झाली ? हत्या करणाऱ्या आरोपींची गुन्हेगारी इतिहास काय आहे, याचे कागदपत्रच देशमुख कुटुंबाने नामदेव शास्त्री यांना दाखविले. संतोष देशमुख यांची हत्या करणारे आरोपी हे गुन्हेगारी वृत्तीचे होते. तसेच काही समाजकंटक जाणीवपूर्वक याला मराठा वंजारी असा जातीय रंग देत आहेत. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे शेती करणारे वंजारी समाजातले मुंडे कुटुंब होते. यामुळे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या जातीतून झाली नसून याला गुन्हेगारी वृत्ती कारणीभूत आहे आणि अशा आरोपींना कठोर शिक्षा मिळावे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी धनंजय देशमुख व वैभवी देशमुख यांनी केली.
..हा महाराष्ट्रातील जातीयवादाचा नवा अंक; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जरांगे पाटलांचा घणाघाती वार
त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी देशमुख कुटुंबाला आश्वास्त केले. या हत्येचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. देशमुख कुटुंबियाच्या दुःखात भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी न्यायव्यवस्थेने तातडीने पावले उचलावीत, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे.
वैभवीने शास्त्रींना अनेक प्रश्न विचारले
तुम्ही आरोपींची मानसिकता काय होती, असे सांगितले. पण माझ्या वडिलांच्या अंगावर अनेक वार केले आहेत. त्यांचा एकही अवयव शाबूत राहिला नाही. आमचा विचार केला पाहिजे होता तुम्ही आमचे एेकूण घेतले पाहिजे होते ? असे प्रश्न वैभवीने विचारले. त्यावर नामदेव शास्त्री म्हणाले, मी काहीही बोललो नाही. हा प्रकार समाजातील वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही भगवानगडाचे शिष्य आहात तर मी तुमच्या बाजूने आहे. मस्साजोग, केज तालुका हा बाबाला मानणारा आहे. माझा बोलण्याचा गैरसमज झाला आहे. तुम्ही मला गुन्हेगारांचे गुन्हे दाखून दिले आहे. इतर लोकांनी चुकीचा अर्थ लावला असेल. मी देशमुख कुटुंबाचा पाठीशी आहे. मी भगवानबाबाला प्रार्थना करतो, लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॉक कोर्टात चालली पाहिजे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, भगवान गड त्यांच्या पाठीशी आहे, हे भगवान गडाच्या गादीवरून सांगतो, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.