आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होणार; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावरून आव्हाडांचा वार
Jitendra Awhad on Namdev Shastri : महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखन केल्यानंतर महाराष्ट्रात मोठं वादळ उठलं आहे. यामध्ये अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. (Jitendra Awhad ) मात्र, अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे हे आधुनिक तुकाराम महाराज आहेत असं म्हणत खोचक शब्दांत टीका केली आहे.
आरोपींची मानसिकता समजून घ्या, नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले
जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्री महाराजांच्या वक्तव्यानंतर दिली प्रतिक्रिया भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रमाणपत्र दिले आहे. तसेच या प्रकरणात ज्यांनी संतोष देशमुख यांचा हत्या केली त्यांची मानसिक अवस्था देखील पाहावी अशी मागणी देखील नामदेव शास्त्री महाराज यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे.
नामदेव शास्त्रींनी काय म्हटलं होतं?
जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध चालू आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, त्यांची मानसिकता का नाही दाखवली, त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती, ते सुद्धा दखल घेण्याजोगं आहे असं नामदेव शास्त्री म्हणाले. तो गावातला विषय होता, पण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत असं नामदेव शास्त्री म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा टोला काय?
महंत म्हणतात की पंकजा मुंडे माझ्याकडे आल्या नव्हत्या म्हणून मी त्यांची बाजू घेतली नाही. कराड हा आरोपी आहे. तर धनंजय मुंडे हे मंत्री असल्याने आपण त्यांची बाजू घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. संतांनी शेवटच्या माणसाचे ऐकले पाहिजे. मूळात ते ज्या गादीचा वारसा चालवित आहेत त्या गादीला मोठी परंपरा आहे. भगवान गडची जागा एका कासार समाजातील व्यक्तीची आहे. त्यानंतर भीमसेन महाराज आले, ते राजपूत समाजाचे होते.
ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. बाबासाहेबांच्या मनमाड परिषदेत संत भीमसेन गुरुजी सामील झाले होते. त्यांना कुणाला त्या जागेवर बसवायच होतं आणि तिथे कोण मोटारसायकलवर येऊन बसलं हे सगळ्यांना माहिती आहे. संत तुकाराम यांची कधी जात चर्चेत आली नाही. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने संत पदी नेले होते. या गादीचा मान राखायला हवा. आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.