आरोपींची मानसिकता समजून घ्या, नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले

  • Written By: Published:
आरोपींची मानसिकता समजून घ्या, नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले

Dhananjay Deshmukh : महंत नामदेव शास्त्री (Mahant Namdev Shastri) यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात उघडपणे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बाजू घेतली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गुन्हेगार नाहीत, त्यांच्या पाठीशी भगवानगड (Bhagwangad) भक्कमपणे उभा आहे, असं ते म्हणाले. यावर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी भाष्य केलं.

घडलेला दुर्दैवी घटनेवर राजकारण करण्याची काँग्रेसची सवय; सुजय विखेंचा नाना पटोलेंना प्रत्युत्तर 

आम्ही भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहोत. त्यांना पुराव्यांची फाईल करणार सादर करणार आहोत, असं धनंजय देशमुख म्हणाले.

धनंजय देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नामदेव शास्त्रींच्या आरोपींच्या मानसिकतेचा विचार करायला हवा, या वक्तव्याविषयी विचारले असता धनंजय देशमुख म्हणाले की, नामदेव शास्त्री सांगत आहेत की, जे खुनातील आरोपी आहे. त्या आरोपींची मानसिकता चापट मारल्यामुळं खराब झाली. पण ही अपुरी माहिती असल्यानं नामदेव शास्त्री असं बोलत आहे. आरोपी आधी खंडणीसाठी आवादाच्या प्लॅंटवर आले होते. तिथं त्यांनी अशोक सोनोने याला मारहाण केली. त्याला काठ्यांनी मारले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे. रविवारी भगवान गडावर जाऊ हे सीसीटीव्ही फुटेज नामदेव शास्त्रींना आम्ही दाखवणार आहोत, असं धनंजय देशमुख म्हणाले.

राज ठाकरेंकडून संगमनेरच्या मतदारांचा अपमान; सुजय विखेंनी घेतला ‘त्या’ वक्तव्याचा समाचार

पुढं ते म्हणाले, आरोपींना अशोकला मारहाण केली, मग अशोकनेही आरोपींना मारहाण करायची होती का? त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी हे प्रकरण संतोष देशमुखांच्या कानावर घातलं. आरोपींनी संतोष देशमुखचीही हातापायी केली. संतोष देशमुखने ज्या आरोपीला चापट मारली, त्या चापट मारलेल्या आरोपींवर २२ गुन्हे आहेत. एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा भीषण खून केला. एक चापट मारली म्हणून त्यांची मानसिकता काय झाली असेल, असं तुम्ही म्हणता. मग आज आमची मानसिकता काय झाली असेल?, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.

आरोपींवर किती गुन्ह्यांची नोंद आहे? याची सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. आता रविवारी भगवान गडावर जाऊन त्यांना ही फाईल दाखवणार आहे, असंही धनंजय देशमुख म्हणाले.

नामदेव शास्त्री काय म्हणाले?
आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे गुन्हेगार आहे, त्यांचा शोध घेतला जात आहे. पण ज्या लोकांनी हे प्रकरणं केलं, हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली? हे मीडिया का दाखवत नाही. त्यांना मारहाण का झाली, हेही दखल घेण्याजोगे आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, त्यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube